shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

बेलापूर येथील श्री साईबाबा मंदिरातील दानपेटी व चांदीच्या पादुकांची चोरी


अकरा रिक्षामधील बॅटऱ्याही चोरीला

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
काल रात्री चोरट्यांनी बेलापुर येथील श्री साईबाबा मंदीर, हनुमान मंदिर येथे चोरी केली असुन बेलापुर गावात बस स्टँड समोर नंबरला उभ्या असलेल्या नऊ रिक्षा तसेच रामगड येथील दोन रिक्षा अशा एकुण अकरा रिक्षामधील बँटरी तसेच एका रसवंती गृहामधील ईन्व्हटर व तेथील बॅटरी चोरट्यांनी लांबविली. घटनेची माहीती मिळताच उपविभागीय पोलीस अधीकारी बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. 

बेलापुर येथील श्री साईबाबा मंदिरात चोरट्यांनी समोरुन प्रवेश केला मंदिराला लावलेले कुलूप तोडून मंदिरात असलेल्या साईबाबांच्या चांदीच्या पादुका तसेच दानपेटी घेवुन चोरटे फरार झाले,मंदिराच्या काही अंतरावरच ती दानपेटी फोडलेल्या अवस्थेत आढळून आली असुन त्यातील रक्कम घेवुन चोरटे पसार झाले, तसेच गावातील एस टी बस स्टँडसमोरील नंबरसाठी लावण्यात आलेल्या नऊ रिक्षा तसेच रामगड येथे घरासमोर उभ्या असलेल्या दोन रिक्षा अशा अकरा रिक्षाच्या बॅटऱ्या चोरट्यांनी चोरुन नेल्या, जाताना रामगड जवळ असणाऱ्या हनुमान मंदिरातही उचकापाचक केली तेथील दानपेटीत काही नसल्यामुळे त्यांनी दानपेटी तशीच ठेवली परंतु मंदीरात असलेले छोटे कपाटाचे कुलुप तोडून उचकापाचक केली तसेच बेलापुर रोडवर नव्यानेच झालेले कोहिनूर रसवंती गृह येथील ईन्व्हटर व बॅटरी घेवुन चोरटे पसार झाले असुन अनेक ठिकाणी भुरट्या चोऱ्या करुन चोरट्यांनी बेलापुर पोलीसांना अव्हानच दिले आहे, काही दिवसांपूर्वी रामगड येथील ओहोळ यांच्या घरात दिवासा चोरट्यांनी दागीने व रोख रक्कम घेवून पोबारा केला होता त्या घटनेचाही अजून तपास लागलेला नाही.या घटनेची माहीती मिळताच ग्रामस्थ खबर देण्यासाठी बेलापुर पोलीस स्टेशनला गेले असता अनेक वेळा आवाज देवुनही पोलीस स्टेशनला असलेला कर्मचारी झोपेतुन उठला नाही. गावात रात्रीची गस्तही बंद झालेली आहे .अनेक ठिकाणी आडवी तिडवी वहाने उभी असतात, रहदारीला अडथळा निर्माण होतो परंतु रात्रीही अन् दिवसाही पोलीस गावात फिरकत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे, शनिवारी तर झेंडा चौकात प्रचंड गर्दी होते. 

याच त्या चोरी गेलेल्या पादुका..!

तक्रारी करुनही काहीच कारवाई होत नसल्यामुळे लोकही तक्रार करण्यास पोलीस स्टेशनला जात नाही. बेलापुर पोलीस स्टेशन अंतर्गत मोठा परिसर आहे त्यामुळे येथे कार्यक्षम पोलीसांची नियुक्ती करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार देवीदास देसाई - बेलापूर 
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close