श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील डी.पॉल पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांकडून आपल्या आजी - आजोबा यांचा सन्मान करण्यासाठी आज शाळेमध्ये आजी - आजोबा दिन उत्साहात साजरा केला.
याप्रसंगी सर्व विद्यार्थ्याचे आजी - आजोबा हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात संचलानाने झाली ,शाळेचे प्रीन्सिपल रेव फादर शीजो व्हाईस प्रिन्सिपल सी.दीप्ती, व्यस्थापक रेव्ह.फादर फ्रा्नको हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्यावतीने यावेळी सर्व आजी - आजोबा यांचे ओक्षण करून शाल,पुष्गुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विविध सांसकृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.यात आजी - आजोबा यांच्यावर आधारित नाटिका,नृत्य, आणि गीत गायन कार्यक्रम सादर करण्यात आले.
प्रिंसिपल फादर शिजों यांनी विद्यार्थ्यांना आजी - अजोबा यांचे आपल्या जीवनातील महत्व समजावून सांगितले.
यानंतर आजी - आजोबा यांच्यासाठी मनोरंजन पूर्ण खेळांचे आयोजन करण्यात आले व त्यात विजयी
ठरलेल्या आजी - आजोबांना छोटंसे गिफ्ट देण्यात आले.
कार्यक्रममाचे सूत्रसंचालन इयत्ता ९ चे विद्यार्थी त्वीशा चव्हाण, शिवानी नगरकर, अमित कुमार,व सम्यक पाटील यांनी केले.
आभार प्रदर्शन वैभव सामल याने केले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन वर्गशिक्षक आशिष अमोलिक सर यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे पी.आर. ओ. अशोक पवार सर,रोहित पवार सर,गौतम फुलपगार सर,संदिप जाधव सर, नारायण सर, स्मिता कांबळे मॅडम,सोनम वाधवा मॅडम, रुही शेख मॅडम ,शबाना मॅडम, दीपक कदम
यांनी विशेष परिश्रम घेतले.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111