shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

पत्रकार उद्धव फंगाळ यांनी सहकुटुंब केली विठ्ठल वारी !


पत्रकारांच्या हितासाठी
घातले विठ्ठलाला साकडे !

मेहकर / प्रतिनिधी:
दैनिक विदर्भ सत्यजित आणि दैनिक साईसंध्या (बुलढाणा आवृती) चे संपादक पत्रकार उद्धव फंगाळ यांनी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची वारी केली,यावेळी पत्रकार उध्दव फंगाळ यांनी सर्व पत्रकार बांधवांच्या चांगल्या हितासाठी श्री विठ्ठलाला साकडे घातले.

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल भगवान यांची मोठी यात्रा भरत असते,आवघी पंढरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा या पांडुरंगाच्या नावे दुमदूमली जाते, यानिमित्त एक ते दीड महिन्याच्या अगोदरच महाराष्ट्रातील प्रत्येक गावांमधून दिंडी व वारकरी मोठ्या संख्येने विविध पालख्या घेऊन श्री क्षेत्र पंढरपुरात दाखल होत असतात, यादरम्यानं विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येतात, जवळपास दोन अडीच महिने दिंडी वारकऱ्यांचा धार्मिक सोहळा सुरूच असतो, एक धार्मिक वातावरण महाराष्ट्रामध्ये या निमित्ताने निर्माण होत असते, याच पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीनिमित्त दैनिक साईसंध्या व दैनिक विदर्भ सत्यजित चे संपादक उध्दव फंगाळ यांनी त्यांच्या आपल्या सहकुटुंब पंढरपूर वारी केली, या दरम्यान श्री विठ्ठलाला साकडे घालताना पत्रकार उध्दव फंगाळ म्हणले की, महाराष्ट्र मध्ये अलीकडच्या काळात पत्रकारावर येत असलेला दबाव, षडयंत्र पत्रकारावर होणारे हल्ले यासंदर्भात विठ्ठलाकडे साकडे घालून भविष्यात येणारे दिवस हे सर्व पत्रकार बंधू - भगीनींसाठी चांगले यावे, पत्रकारांच्या कुटुंबामध्ये चांगले दिवस येऊन एक रोखठोक व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्व पत्रकारांना निर्भयपणाने लिखाण करता यावे, शासनाकडून पत्रकारांसाठी संरक्षण व विविध सवलती देण्यात याव्यात, ग्रामीण भागातील पत्रकारांची सध्या खुपच दयनिय अवस्था आहे, कोणत्याच वर्तमानपत्र वाल्यांकडून ग्रामीण भागातील पत्रकारांना कोणतेही आर्थिक सहकार्य मिळत नाही, शिवाय ग्रामीण भागातील पत्रकारांवर एखांदा वाईट प्रसंग उद्भवल्यास वर्तमानपत्रवाल्यांकडून  पाहिजे तसा प्रतिसाद किंवा खंबीर पाठिंबा वेळप्रसंगी पत्रकाराला मिळत नाही,असे अनेक प्रकार महाराष्ट्र मध्ये सुरू आहेत, त्यामुळे खरी रोखठोक व सकारात्मक पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांमध्ये उदासीनता दिसून येत आहे, पत्रकार हा लोकशाहीतील चौथा आधारस्तंभ आहे, पत्रकारांना स्वतंत्रपणे लिखाण करता यावे यासाठी सर्व पत्रकार बांधव धडपड करत असतात, मात्र हे लिखाण करत असताना अनेक ठिकाणी पत्रकारावर दबाव तंत्राचा वापर होतो, असे प्रकार भविष्यात घडू नये एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी पत्रकारांचे लिखाण सुद्धा चांगले असले पाहिजेत, पत्रकार बांधवांनी आपले कुटुंब सांभाळून समाज हितासाठी काम करावे व येणारा काळ हा पत्रकारांसाठी चांगला असला पाहिजे असे साकडे पत्रकार उद्धव फंगाळ यांनी श्री विठ्ठलाकडे घातले.
close