श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते हाजी आरीफ हसन बागवान यांची महाराष्ट्र विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात यावी यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील नामवंत सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, व्यापारी, उद्योजक, कला-साहित्य, नाट्य, वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी राज्याचे राज्यपाल महामहीम रमेशजी बैस यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात त्यांनी हाजी आरिफ हसन बागवान यांचे सामाजिक कार्य, पुरग्रस्तांना त्यांनी जीव धोक्यात घालून केलेली मदत, महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीचे सदस्य म्हणून केलेले उत्कृष्ट कार्य, त्यांची धार्मिक वृत्ती सर्व समाजात असलेली लोकप्रियता, कोविड काळात त्यांनी स्वखर्चाने केलेले मदत कार्य, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल या सारख्या क्रिडा प्रकाराचे प्रसार-प्रचार यासाठी स्वखर्चाने केलेले कार्य, ग्रामीण भागात होणाऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, श्रीरामनवमी,ऊरुस, नाट्यसंमेलने, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबीरे यात असणारा उस्फूत सहभाग या विषयी माहिती देवून त्यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेवर नियुक्ती व्हावी अशी मागणी केली आहे.
माननीय महामहिम राज्यपाल महोदयांबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस,महसुल मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, मा. खा. शरदचंद्र पवार, शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख उद्धवराव ठाकरे आदींकडे केलेली आहे.
या निवेदनावर ऍड. राजेश बोर्डे पाटील, सुरेंद्र पानपाटील, शेख इकबाल रमजान, वसिम कुरेशी, जोएफ जमादार, कुरेशी कासम, शेख जलील रमजान, शेख जावेद हमीदभाई, शेख पे. वसीम, ताजमोहमंद शेख, नदीम तांबोळी, हाजी साजीद मिर्झा, सलीमभाई, महेंद्र सातदिवे, बाबा गांगड, इम्रान शेख, फैय्याजभाई कुरेशी, मतीन शेख, शेख मुनीर दादामियाँ, निसार कुरेशी, रियाज खान पठाण, लकी सेठी, वसंतलाल भंडारी, संजय जोशी, पत्रकार, राजेंद्र बोरसे,पत्रकार, प्रताप कुलथे, नगरसेवक राजेश अलघ, मुक्तारभाई शहा, अहमदभाई जहागीरदार, फिरोज पठाण, जावेद तांबोळी, जावेदभाई जहागीरदार, रवि गरेला, शेख अमान बाबुभाई, देवळाली, हाजी फैय्याजभाई बागवान, जाकीरभाई शाह, इब्राहीम बागवान आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.