shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

सरलाबेट ते पंढरपूर दिंडीचे शिरसगांवमध्ये भव्य स्वागत


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगांव येथे श्रीक्षेत्र गोदावरी धाम गंगागिरी महाराज दिंडीचे शिरसगांव ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने दिंडीचे आगमन झाल्यावर मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांचा सरपंच राणीताई वाघमारे, उपसरपंच संजय यादव, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष गणेशराव मुदगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दि.१ जुलै रोजी श्रीक्षेत्र गोदावरी धाम ते पंढरपूर महाराष्ट्रातील शिस्तप्रिय दिंडीला प्रारंभ झाला.दिंडीचा पहिला मुक्काम भास्करराव गलांडे पा.विद्यालयात झाला. दि २ रोजी श्रीरामपूर उत्सव मंगल कार्यालयात दिंडीचा मुक्काम होणार असल्याचे श्री गणेशराव मुद्गुले यांनी सांगितले. भक्तियोग व कर्मयोग वेगळा नाही तर ते दोन्ही एकमेकांना परस्पर पूरक आहेत. भक्तीव्दारे कर्म करण्याचे ज्ञान मिळते. गंगागिरी महाराज नित्य वारी करत.आज आपण ही परंपरा सांभाळीत आहोत असे महंत रामगिरी महाराज म्हणाले. शिरसगाव येथून दिंडी निघाल्यावर इंदिरानगर, उड्डाणपूल मार्गे श्रीरामपूरकडे रवाना झाली.यावर्षी सुरक्षेच्या दृष्टीने दिंडीच्या रथाच्या चारही बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दिंडीत गणेशराव मुद्गुले, सरपंच राणीताई वाघमारे, उपसरपंच संजय यादव, केदार यादव,आदी तसेच माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक,किशोर पाटील, सुभाष यादव आदी २५०० ते ३००० भाविक दिंडीत सहभागी झाले होते.पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व पोलीस स्टाफ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close