अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ मध्ये पदवी, पदव्यूत्तर व अभियांत्रिकी अभ्याक्रमामध्ये सरासरी ६० टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम बारा पोट जातीतील विद्यार्थी, विद्यार्थीनींना ज्येष्ठता व गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम तीन ते पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी २५ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
शिष्यवृत्ती मागणी अर्जासोबत जातीचा दाखला, फोटो, गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र आदी कागदपत्रे dmlasdcnagar@ggmail.com या ई-मेल पत्त्यावर अथवा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सावेडी नाका, मनमाडरोड, अहमदनगर येथे प्रत्यक्ष सादर करावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:* समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111