shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

स्वच्छतेच्या कामांबाबत पालिकेचे दुर्लक्ष, अन्यथा घेराओ आंदोलन; सौ. मंजुश्रीताई मुरकुटे


शौकतभाई शेख / श्रीरामपूर:
 नगरपरिषद हद्दीतील प्रमुख व प्रभागातील अंतर्गत रस्त्यावर पावसामुळे जागोजागी खड्डे पडले असून खड्यांमध्ये पाणी साचलेले आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत असून प्रसंगी अपघातही होत आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविणे आवश्यक असल्याचे लेखी निवेदन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांना नुकतेच देण्यात आले. 

           निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर शहर हद्दीतील नाले-गटार साफ करणे, सार्वजनिक संडास- मुताऱ्यांची स्वच्छता ठेवणे आदी कामांबाबत पालिकेचे दुर्लक्ष झालेले आहे. पावसाचे पाण्यामुळे गटारी तुंबने, गटारीतील सांडपाणी इतरत्र पसरणे, डबके साचणे यामुळे प्रभागांमध्ये अस्वच्छता पसरलेली आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढत चालले असून भविष्यात साथीचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
          तसेच नगरपालिकेने शहरातील कचरा उचलण्याचे काम ठेकेदार एजन्सीकडे दिलेले आहे. परंतू संबंधित ठेकेदार एजन्सीकडून वेळच्यावेळी कचरा उचलला जात नाही. घंटागाडी प्रभागामध्ये फिरत नसल्यामुळे कचरा तसाच पडून आहे. त्यामुळे आपण संबंधित ठेकेदारास योग्य त्या सूचना देवून घंटागाडी संपूर्ण प्रभागात वेळच्यावेळी फिरली पाहिजे व नियमितपणे कचरा उचलला गेला पाहिजे. अन्यथा याप्रश्नी लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
           निवेदन सादर करताना माजी नगरसेविका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, लोकसेवा विकास आघाडीचे शहर अध्यक्ष नाना पाटील, रोहन डावखर, नानासाहेब गांगड, प्रमोद करंडे, वैभव सुरडकर, कैलास भागवत, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

*पत्रकार अफजल मेमन श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -*9561174111
close