shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

१० हजार लाभार्थ्यांना अडीच कोटींचा लाभ संजय गांधी योजना समितीचे गणेश मुदगुले, मिलिंदकुमार साळवे यांची माहिती..!

श्रीरामपूर /प्रतिनिधी:
 संजय गांधी निराधार योजना व इंदिरा गांधी योजनेअंतर्गत श्रीरामपूर तालुक्यातील १० हजार ३८२ लाभार्थ्यांना जून २०२४ अखेरीस २ कोटी ४९ लाख ९८ हजार १०० कोटी रुपयांचा लाभ मिळाल्याची  माहिती श्रीरामपूर तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष गणेश मुद्गुले, सदस्य मिलिंदकुमार साळवे, सतीश सौदागर व दीपक चव्हाण यांनी दिली. 



पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजना अनुदान समितीचे कामकाज श्रीरामपूर तालुक्यात सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान देण्यात येत आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निर्वाह वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना अशा राज्य व केंद्र सरकारच्या अर्थसहाय्यातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध सामाजिक अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहेत. पूर्वी या योजनांसाठी वेळेवर पुरेशा प्रमाणात निधीची उपलब्धता होत नसल्यामुळे लाभार्थ्यांची आर्थिक हेळसांड होत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या काळात समाजाच्या तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. श्रीरामपूर तालुक्यात पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष गणेश मुद्गुले व सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी सांगितले. चालू सन २०२४-२५ या  आर्थिक वर्षातील जून महिन्यापर्यंतचे अनुदान श्रीरामपूर तालुक्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात आले आहे. सर्वसाधारण वर्गातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ३२५ लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे ४९ लाख २७ हजार ५०० रुपये अनुदान जून अखेरीस जमा करण्यात आले आहे. याच योजनेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील १०२७ लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये १५ लाख ४० हजार ५०० रुपये, तर अनुसूचित जाती प्रवर्गातील ३९८ लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये १७ लाख ९१ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. याशिवाय राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेच्या १७ लाभार्थ्यांना १९ हजार २०० रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेच्या ३८६ लाभार्थ्यांना १३ लाख ९८ हजार ६०० रुपयांचा लाभ मिळाला आहे. श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेच्या अ गटातील २ हजार ९४२ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकूण १ कोटी १४ लाख ७३ हजार ८०० रुपये तर याच योजनेच्या ब गटातील सर्वसाधारण १ हजार ६४०  लाभार्थ्यांच्या बँक खात्यात  २४ लाख ६० हजार रू. अनुदान जमा झाले आहे. अनुसूचित जातीतील ५६५ लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून ८ लाख ४७  हजार ५०० रुपये अनुदानाचा लाभ मिळाला आहे. याच योजने मधील अनुसूचित जमाती च्या १२२ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ५ लाख ४९ हजार रुपये अनुदान असे सर्व प्रकारच्या विविध सामाजिक अर्थसाह्य योजनेच्या १० हजार ३८१ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात २ कोटी ४९ लाख ९८ हजार १०० रुपयांचे अनुदान जून महिन्याच्या अखेरीस जमा झाल्याचे श्रीरामपूर तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष गणेश मुद्गुले व सदस्य मिलिंदकुमार साळवे सतीश सौदागर, दीपक चव्हाण नारायण काळे यांनी सांगितले.

*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close