shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यामुळे शिवसेनेत असंतोष ...


करमाळा / प्रतिनिधी

     करमाळा माढा तालुका विधानसभा उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी मागचा पुढचा विचार न करता उमेदवारी जाहीर केल्याने करमाळा शिवसेनेत असंतोष पसरला आहे यामुळे करमाळा तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी तातडीची बैठक घेऊन नाराजी व्यक्त केली .

      यावेळी बोलताना तालुका प्रमुख सुधाकर लावंड यांनी म्हटले आहे की याअगोदर 1990 साली पद्माकर झानपुरे, ऍड शिवाजीराव मांगले त्यानंतर स्व दिगंबरराव बागल (पुरस्कृत),सूर्यकांत पाटील,जयवंतराव जगताप,नारायण पाटील,रश्मी बागल यांनी अधिकृत चिन्हावर शिवसेनेकडुन निवडणूक लढविल्या होत्या तर यावेळी परंपरेप्रमाणे शिवसेना (उद्धव ठाकरे) ही करमाळा विधानसभा लढणार आहे वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल व पक्षप्रमुखउद्धव ठाकरे जो उमेदवार देतील त्या उमेदवाराचा प्रचार  आम्ही करू कारण ही जागा मुळ शिवसेना पक्षाची म्हणजे मशाल या चिन्हाचा उमेदवार असावा असे परखड मत व्यक्त केले .

      यावेळी उपजिल्हाप्रमुख शाहुराव फरतडे,तालुका संघटक प्रवीण कटारिया, शहराध्यक्ष संजय शिंदे,युवा सेना ता प्रमुख शंभुराजे फरतडे, युवा सेना शहर प्रमुख समीर  हलवाई,उपशहर प्रमुख आदित्य जाधव,शिवसेना उपप्रमुख संतोष गांनबोटे,पंकज परदेशी व सर्व शिवसैनिक उपस्थित होते .
close