shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्रीलंकेत भारताला कोण त्रासदायक ठरेल ?


               टिम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात लक्षवेधी मालिका येत्या २७ जुलैपासून श्रीलंकेत सुरू होत आहे. यामध्ये प्रथम तीन टि२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील आणि त्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २ ऑगष्टपासून सुरू होईल. या दोनही सफेद चेंडूच्या मालिकांसाठी दोन वेगवगळे सघव वेगवेगळे संघनायक नियुक्त केले आहेत. या मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा झाली आहे. भारतीय संघ तीन दिवसांपूर्वीच लंकेत दाखल झाला असून आपली तयारीही सुरू केली आहे. दरम्यान मालिकेचा पहिला सामना सुरू होण्यापूर्वी, भारतीय संघाने टि२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये श्रीलंकेविरुद्ध कशी कामगिरी केली हे थोडक्यात जाणून घेऊया.

               टिम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात पहिला टि२० आंतरराष्ट्रीय सामना सन २००९ मध्ये खेळला गेला, तेंव्हापासून हे दोन्ही संघ या प्रारूपात २९ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी टिम इंडियाने १९ सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेने केवळ ९ सामन्यात बाजी मारली. एक सामना निकाला शिवाय संपला. म्हणजे टिम इंडियाचा वरचष्मा दिसतो. पण ही नवीन मालिका आहे, त्यात काहीही होऊ शकते, प्रत्यक्ष मालिका सुरू झाल्यानंतरच कोण वरचढ ठरेल हे समजेल.

या मालिकेसाठी भारतीय टि२० संघ असेल.
सुर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.

श्रीलंका संघ : - चरित असलंका (कर्णधार) पथुम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडिमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालागे, महेश थेक्सान्का, नुस्साना, नुस्नाह, नुस्ना, दुष्मंथा चमीरा, बिनुरा फर्नांडो

                  सुर्यकुमार यादव टि२० मालिकेसाठी टिम इंडियाचे कर्णधारपद सांभाळणार आहे, तर श्रीलंकेची कमान चरिथा असलंकाकडे सोपवण्यात आले आहे. सुर्यकुमार यादवने काही सामन्यांमध्ये टि इंडियाचे नेतृत्व केले असेल, पण असलंका पूर्णपणे नवीन आहे. किमान टि२० आंतरराष्ट्रीय सामन्यांबाबत तरी असे म्हणता येईल. एकंदरीत दोघेही नवे कर्णधार असून त्यांच्या कर्णधारपदाचीही कसोटी लागणार आहे.  

             दोन्ही संघांमधील सामन्यांमध्ये धावा काढण्याच्या बाबतीत सर्व भारतीय फलंदाज अव्वल आहेत.  शिखर धवन, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे त्रिकूट अनुक्रमे ३७५, ३३९ आणि ३३९ धावांसह आघाडीवर आहे.  विकेट्स घेण्याच्या बाबतीत, भारताचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल १७ विकेटसह पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर दुष्मंथा चमीरा (१६) आणि आर अश्विन (१३) बळी यांचा नंबर लागतो. 

              एकंदरीत टि२० सामन्यात प्रत्यक्ष सामन्याच्या दिवशी कोणीही वरचढ ठरू शकतो. मात्र श्रीलंकेचे हे पाच खेळाडू भारताला त्रासदायक ठरू शकतात त्यांच्या विषयी थोडक्यात जाणून घेऊया.                   लंका प्रीमियर लीगमध्ये अविष्का फर्नांडोच्या बॅटने चांगली कामगिरी केली आहे.   दहा सामन्यांपैकी ५ वेळा ५० पेक्षा जास्त धावा त्याने काढल्या असून, १६३ च्या स्ट्राईक रेटने त्याने आपला आलेख उंचावला.  टि२० इंटरनॅशनलमधील त्याचे रेकॉर्ड काही खास नाही पण अलीकडच्या फॉर्ममुळे भारताला त्याच्यापासून सावध राहावे लागेल.

             पथुन निसांका हा सध्या श्रीलंकेचा सर्वोत्तम फलंदाज आहे.  त्याने यावर्षी वनडेत द्विशतक झळकविले आहे. लंका प्रीमियर लीगमध्ये त्याने चांगली सुरुवात केली होती आणि शतकही झळकावले होते.  गेल्या ६ सामन्यांत तो एकदाच दुहेरी आकडा गाठू शकला असला तरी भारताला त्याच्यापासून धोका असेल.

             मथिशा पाथिरानाला आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव आहे.  यामुळेच तो भारतीय खेळाडूंना चांगलाच ओळखतो.  पाथिरानाकडे अचूक यॉर्कर आहे.  यामुळे तो कोणत्याही फलंदाजाला अडचणीत आणू शकतो. या सोबतच तो संथ चेंडूने फलंदाजांना फसवतो.

             लेगस्पिनर वानिंदू हसरंगा जगातील अव्वल गोलंदाजांपैकी एक आहे. चेंडू सोबतच तो बॅटनेही खालच्या क्रमवारीत टिम इंडियासाठी अडचणी निर्माण करू शकतो. टि२० आंतरराष्ट्रीय मधील त्याची सर्वोत्तम कामगिरी भारताविरुद्धच आहे. सन  २०२१ च्या दौऱ्यात त्याने ९ धावांत ४ बळी घेतले.

            दासुन शनाका हा श्रीलंकेचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे.  तो चेंडूने टिम इंडियाला  फलंदाज व गोलंदाज म्हणूनही त्रास देऊ शकतो  नुकत्याच पार पडलेल्या लंका प्रीमियर लीगमध्ये तो चेंडूवर खूप प्रभावी होता.

              तर, चला घोडा मैदान जवळच असून विश्वविजेता संघ श्रीलंकेत कशी कामगिरी करतो व आपला विजयांचा आलेख कसा उंचावतो.

डॉ.दत्ता विघावे,
क्रिकेट समिक्षक
मो.नं. - ९०९६३७२०८२
close