अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत राज्यातील कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शेतकरी, संस्था आणि गटांना विविध पुरस्कार दिले जातात. यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, सेंद्रिय शेती कृषीभूषण पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कारांचा समावेश आहे.
या पुरस्कारांसाठी २०२३ या वर्षासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. शेतकरी, गट, संस्था यांनी २५ जुलै २०२४ पर्यंत आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावा तसेच अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन अहमदनगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - *9561174111