*' राष्ट्रीय समाज पक्षाच्या अनुसूचित जाती जमाती च्या तालुका अध्यक्षपदी अविनाश मोहिते.
इंदापूर: आज इंदापूर येथे राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुका पदाधिकारी कार्यकर्ते यांची विविध विषयांवर बैठक पार पडली. यावेळी अविनाश मोहिते यांची पश्चिम महाराष्ट्र अनुसूचित जाती-जमाती अध्यक्ष गणेश लोंढे यांच्या शिफारशीनुसार त्याची निवड करण्यात आली.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख तानाजी शिंगाडे, जिल्हाध्यक्ष किरण गोफने, इंदापूर तालुका पश्चिम भागाचे अध्यक्ष तानाजी मारकड, तसेच नवनिर्वाचित पूर्व भागाचे अध्यक्ष नवनाथ कोळेकर, शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते, कार्याध्यक्ष गणेश हेगडकर, उपाध्यक्ष लक्ष्मण तरंगे, राहुल लोखंडे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,*