शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) सामाजिक बातमी
अ नगर: विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना किंवा कोणताही उपक्रम करताना त्यामध्ये सातत्य ठेवले पाहिजे तरच जीवनात यश मिळते असं प्रतिपादन माजी सैनिक विजय साळवे यांनी केले
श्रीमती ॲबर्ट विद्यालय भिंगार येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
श्री साळवे म्हणाले कि,सैनिक देशासाठी खूप अनमोल असून सैनिक
हे देशाची शान आहे सैनिकांचा आदर कायम स्वरूपी असावा
व्यक्त केली
सैनिक हा देशाचा महत्त्वाचा घटक असून सैनिकांना देशासाठी खूप त्रास सहन करावा लागतो विद्यार्थ्यांनीही सैनिक व्हावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्राचार्य तोरणे म्हणाले की,सैनिकांमुळेच आपणास सुरक्षित आहोत सैनिक देशाचा प्राण आहेत विद्यालयाच्या वतीने सैनिकांना आम्ही वंदन करतो . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्वर सरांनी केले तर आभार एसपी खंडागळे मॅडम यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.