शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) सामाजिक बातमी
श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शिर्डीची वार्षिक सर्वसाधारण सभा श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे साई आश्रम नंबर दोन इमारतीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली उपस्थित सभासदांचे संचालक श्री रविंद्र बाबू गायकवाड यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले व अध्यक्ष पदाची सूचना मांडली त्यास संचालक श्री भाऊसाहेब चांगदेव कोकाटे पाटील यांनी अनुमोदन दिले त्यानंतर विद्यमान चेअरमन श्री विठ्ठल तुकाराम पवार पाटील यांनी सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारले सभेस मोठ्या संख्येने सभासद वर्ग उपस्थित होता विषय पत्रिकेप्रमाणे विषयांचे वाचन संस्थेचे सचिव श्री नबाजी नामदेव डांगे पाटील यांनी केले सर्व विषयांवर साधक बाधक चर्चा होऊन सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले सभेचे अध्यक्ष श्री विठ्ठल तुकाराम पवार पाटील यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात संस्थेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष माननीय न्यायमूर्ती श्री सुधाकर जी यार्लगड्डा साहेब, जिल्हाधिकारी माननीय श्री सिद्धराम सालीमठ साहेब आयएएस, तदर्थ समिती सदस्य तसेच माननीय श्री गोरक्ष गाडीलकर साहेब आयएएस मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच माननीय श्री तुकाराम हुलवळे साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्व प्रशासकीय अधिकारी मुख्य लेखाधिकारी सर्व विभाग प्रमुख त्याचप्रमाणे सर्व सभासदांचे मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले सभेत सभासदांच्या हिताचे व संस्थेच्या हिताच्या अनेक विषयांवर चर्चा झाली संस्थेच्या इतिहासात तब्बल एकूण 20 विषयांवर चर्चा झाली त्यात अनेक मान्यवर सभासदांनी भाग घेतला त्यास दीपावली शिधावाटप मकर संक्रांत वस्तू वाटप मराठी नूतन वर्ष गुढीपाडवा शिधावाटप तसेच संस्थेत शिर्डी शहरांचे मध्यवर्ती ठिकाणी बांधकामा सह जागा खरेदी करण्याचा विषय ही बहुमताने मंजूर झाला परंतु संस्थेचे अद्यावत नूतन कार्यालय उभारण्यास सभासद श्री प्रतापराव होते श्री वाल्मीक धरम श्री विजय डांगे श्री रवींद्र चौधरी श्री पांडुरंग धुमसे यांनी विरोध दर्शविला तर उर्वरित सर्व सभासदांनी बहुमताने शिर्डी शहराचे मध्यवर्ती ठिकाणी बांधकामा सह जागा खरेदी करून संस्थेचे अद्यावत कार्यालय उभारण्यास मंजुरी दिली याप्रसंगी सन 2023 - 24 करिता सभासदांचे शेअर्सवर 15% डिव्हीडंट देण्यास तसेच सभासद ठेवीवर नऊ टक्के प्रमाणे व्याज देण्यास सर्वानुमते मान्यता दिली तर संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल पवार पाटील यांचे संकल्पनेतून जामीनदार मुक्ती बाबत पहिले पाऊल म्हणून सर्व सभासदांचा नैसर्गिक मृत्यूचा विमा उतरविण्यात येऊन होणाऱ्या विमा हप्त्यापैकी 50% विमा हप्ता सभासदांनी तर उर्वरित 50 टक्के हफ्ता संस्थेने भरण्यात यावा असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला त्याचप्रमाणे सर्व सभासद व कर्मचारी यांना दीपावली 2024 निमित्त 50 किलो साखर पाच लिटर गोड तेल दोन किलो मिठाई व सप्रेम भेट वस्तू देण्यास या सभेने मान्यता दिली.
सभेस संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल तुकाराम पवार पाटील व्हाईस चेअरमन श्री पोपटराव भास्करराव कोते पाटील संचालक श्री महादू बापूसाहेब कांदळकर श्री कृष्णा नाथा आरणे श्री भाऊसाहेब चांगदेव कोकाटे पाटील श्री संभाजी शिवाजी तुरकणे पाटील श्री देविदास विश्वनाथ जगताप श्री विनोद गोवर्धन कोते पाटील श्री मिलिंद यशवंत दुनबळे श्री तुळशीराम रावसाहेब पवार पाटील श्री रवींद्र बाबू गायकवाड श्री भाऊसाहेब लक्ष्मण लवांडे पाटील श्री इकबाल फकीर महंमद तांबोळी श्री गणेश अशोक अहिरे सौ सुनंदा किसन जगताप पाटील सौ लता मधुकर बारसे पाटील श्री रंभाजी काशिनाथ गागरे श्री भाऊसाहेब भानुदास लबडे पाटील तज्ञ संचालक सचिव श्री नबाजी नामदेव डांगे पाटील सहसचिव श्री विलास गोरक्षनाथ वाणी तसेच मोठा सभासद वर्ग उपस्थित होता सभेच्या शेवटी संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल पवार पाटील यांनी सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्यास सहकार्य केल्याबद्दल उपस्थित सभासदांचे आभार मानले.