shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

गुरू


विश्वामध्ये चोहीकडे दिसती सारे गुरू !
सन्मानाने सगळे त्यांना वंदन करू !!

सूर्याकडून प्रकाश घ्यावा,
अंधार सारा तुडवित जावा.
चंद्र -ताऱ्यांची शितल प्रिती,
दया, क्षमा, शांती देई निती.
चांदण्यांचे पीक घेण्यास,
सुरुवात ताऱ्यांची पेरणी करू !!

आभाळाकडून माया घ्यावी,
साऱ्या जगाला छाया दयावी.
मेघांचा धर्म जीवन दयावे,
तहानलेल्यांना तृप्त करावे.
आभाळ आणि मेघामध्ये,
इंद्रधनुष्याचे रंग भरू !

सागर देतो पाऊस- पाणी,
पर्वत गातो हिरवी गाणी.
नदी फुलविते शेती-माती,
मानवास अन्न खाया देती.
या उपकारांची जाणीव,
साऱ्यांच्या मनात करू !!

गुरु चालवितो ज्ञानपोई,
आयुष्यभर स्वतःस वाहून घेई.
सुसंस्कारी पिढी घडवितो,
अनुभवांची शिदोरी वाटतो
या देवदूताला, दोन्ही हात
 जोडूनिया नमन करू...!

आज १४ जुलै २०२४ गुरु 
 पौर्णिमेचे औचित्य धरु !!

*कवी : अय्युब पठाण*
 *लोहगांवकर-पैठण*
मो. ९७६४३५०३७४.
*संकलन* 
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close