shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

नागरिकांनी नगरपालिकेच्या नळावाटे होणार्‍या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा. बोअरवेल, कॅनॉल, शुद्धीकरण न केलेल्या विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करू नये

      सध्या पावसाची सतत रिमझिम चालू असल्यामुळे शहरात विविध जलजन्य व किटकजन्य आजाराचे प्रणाम वाढूनये त्यासाठी ग्रामीण रुग्णालयच्या वतीने घरोघरी जाऊन विविध प्रतिबंधात्मक उपायोजना करुन आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. तरी या आजाराना आळा घालण्यासाठी नागरिकांचा त्यामध्ये विशेष सहभाग असायला पाहिजे व त्यांनी वैयक्तिक स्तरावर कोणती खबरदारी घेतली पाहिजे याबद्दल ग्रामीण रुग्णालयच्या वैद्यकीय अधिक्षक डाॅ नम्रता सोनवने मॅडम यांनी नागरिकांना खालील आहवान केले आहेत........!


नागरिकांनी नगरपालिकेच्या नळावाटे होणार्‍या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा. बोअरवेल, कॅनॉल, शुद्धीकरण न केलेल्या विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करू नये. 
 
सार्वजनिक ठिकाणी उदा. शाळा, महाविद्यालये यांना पुरविण्यात येणार्‍या पाण्याच्या टाकीची सफाई करण्यात यावी.
 
सर्व सोसायटीमधील पंपवेल व पिण्याच्या पाण्याच्या टाकीची सफाई करून घेण्यात यावी.
 
शिळे किंवा उघड्यावरचे माश्या बसलेले अन्न पदार्थ खाऊ नयेत, तसेच अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत.
 
हातगाड्यावर, उघड्यावर विकले जाणारे खाद्य पदार्थ खाऊ नयेत.
 
ड्रेनेज यंत्रणेत काही दोष असल्यास त्याची माहिती संबंधित क्षेत्रिय कार्यालये यांना द्यावी.
 
प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे.
 
उलट्या-जुलाब, विषमज्वर वगैरे विकार झाल्यास वेळीच उपचार करून घ्यावेत.  सर्वांची ग्रामीण रुग्णालयात उपचाराची सोय उपलब्ध आहे.
 
पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी उकळून घेऊन पिण्यासाठी वापरण्यात यावे.
 
नागरिकांनी आपल्या घरातील व सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. ओला व सुका कचरा नियमित वर्गीकरण करावा. व घंटा गाडीमध्ये जमा करावा आणि परिसर स्वच्छ राहील अशी काळजी घ्यावी.
 
डास चावल्यामुळे होणार्‍या मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, हत्तीरोग या रोगांसाठी प्रतिबंधात्मक उपाय आरोग्य  प्रतिबंधक विभागामार्फत केले जातात. याबाबत नागरिकांनी वैद्यकीय अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
 
सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांचकडे उपचारास आलेल्या कॉलरा, टायफॉईड, गॅस्ट्रो, डिसेंट्री, कावीळ रुग्णांची माहिती आरोग्य खात्यास त्वरित कळवावी.
 
जेथे लेबर कॅम्प आहे त्या ठिकाणच्या सर्व बांधकाम व्यावसायिकांनी नगरपालिकेच्या नळावाटे पुरविलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. जलजन्य आजार होऊ नयेत याबाबत सर्व कामगारांना सूचना देऊन
दक्षता घ्यावी.
 
पाण्याचे साठे आठवड्यातून किमान एकदा रिकामे करून, घासून पुसून कोरडे करून पुन्हा वापरावेत व पाण्याचे साठे झाकून ठेवावेत.
 
घराभोवताली नारळाच्या करवंट्या,रिकाम्या बाटल्या इत्यादींचा नायनाट करावा.
वापरात नसलेले टायर्स झाकून ठेवावेत/त्यांची विल्हेवाट लावावी.
 
कुलर्स, रेफ्रिजरेटर्स  यातील पाणी आठवड्यातून किमान एकदा बदलावे.
 
पूर्ण अंग झाकेल अशा कपड्यांचा वापर करावा.

वैद्यकीय अधिक्षक 
डाॅ.नम्रता सोनवने
ग्रामीण रुग्णालय चांदूर रेल्वे
close