अहमदनगर / प्रतिनिधी:
शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात व महाराष्ट्रात पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळेची वेळ ही सकाळी ७ पासून सुरु होते. विद्यार्थ्यांच्या शाळेची वेळ सकाळी ७ वा. पासून असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र शासन यांचे दिनांक ०८/०२/२०२४ रोजी शासन परिपत्रक क्रमांक : संकिर्ण २०२४/प्र.क्र.२७/एस.डी.-४ अन्वये पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळेची वेळ सकाळी ७ वा. पासून बदलून सकाळी ९ वा. पासून चालु करण्याचे आदेश दिलेले आहे.
परंतू शहरात, तालुक्यात अथवा जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याच्या जी.आर. प्रमाणे शाळा ९ वा. पासून सुरु न करता पुर्वीपासून चालु असलेल्या ७ वाजल्यापासून सुरु ठेवलेली आहे. व जेणे करुन विद्यार्थ्यांना खुप त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या जी.आर.चे उल्लंघन करुन पुर्ववत ७ वा. चालू असलेल्या शाळांवर शिक्षण विभागाने योग्य ती चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करावी अशी मागणी शिक्षण अधिकारी अहमदनगर जिल्हा प्राथमिक भास्कर पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे एम आय एम चे जिल्हा महासचिव शेख जावेद हाजी, शहर प्रमुख खान सनाउल्लाह, युवा अध्यक्ष खान अमिर, नेते शेख इम्रान, शेख कैसर आदींनी केली आहे.
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111