श्रीरामपूर / प्रतिनिधी:
अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील अशोकनगर फाटा, प्रगतीनगर येथील अशोक आयडियल स्कूल ला पुणे येथील मिमांसा संस्थेद्वारे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत बेस्ट इको फ्रेंडली स्कूल पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, अशी माहिती अशोक कारखान्याच्या संचालिका व अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी दिली.
त्यांनी पुढे सांगितले की, पुणे येथे आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी राज्यभरातील सातशे विद्यालयांनी नोंदणी केली होती. त्यातुन निकष पूर्ण करणाऱ्या दोनशे निवडक विद्यालयांना त्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. अशोक आयडियल स्कूलमध्ये इको फ्रेंडली वातावरण राहण्यासाठी प्लॅस्टिकचा कमी वापर, मुबलक प्रमाणात वृक्षारोपण व संगोपन यासह पर्यावरण संतुलन आणि इको फ्रेंडली वातावरण निर्माण करुन ते टिकविण्यासाठी सतत प्रबोधन केले जाते. माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनातून विद्यालयाच्या आवारात हिरवळीमुळे नयनरम्य परिसर निर्माण झाला आहे. पुणे येथे आयोजित एका शानदार सोहळ्यात प्राचार्य रईस शेख यांनी संस्थेच्या वतीने मिमांसा संस्थेच्या अध्यक्षा सौ.यशोधरा दास यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारला.
या यशाबद्दल प्राचार्य रईस शेख, विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक वृंद आणि विद्यार्थ्यांचे माजी आ. भानुदास मुरकुटे, सौ. मंजुश्रीताई मुरकुटे, कारखान्याचे व्हा.चेअरमन हिम्मतराव धुमाळ, मुळा प्रवरा वीज संस्थेचे सिध्दार्थ मुरकुटे, ॲग्रो इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सोपानराव राऊत, उपाध्यक्ष बाबासाहेब आदिक, सचिव विरेश गलांडे व संचालक मंडळाने कौतुक केले आहे.
पुणे येथे यशोधरा संस्थेच्या अध्यक्षा सौ. यशोधरा दास यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारताना प्राचार्य रईस शेख.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111