shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या कथेची बी.ए. अभ्यासक्रमात निवड


श्रीरामपूर/ प्रतिनिधी:
श्रीरामपूर येथील शिरसगांव इंदिरानगर भागातील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष प्रा.डॉ. बाबुराव दत्तात्रय उपाध्ये यांच्या कथेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत मराठी विषयाच्या प्रथम वर्ष कला शाखा अभ्यासक्रमात निवड करण्यात आली आहे.
 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे येथील सर परशुरामभाऊ स्वायत्त महाविद्यालयातील मराठी विषयासाठी डॉ. उपाध्ये यांच्या'-- आणि कमल सापडली' या कथेचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

     या कथेत मुलेमुली पळवून नेणे आणि त्यामुळे कुटुंब, गाव यांच्या जीवनात कशी कुत्तरओढ होते, त्यातून सुटका प्रसंगाचे अत्यंत हृदयस्पर्शी कथानक गुंफलेले आहे. डॉ. उपाध्ये हे रयत शिक्षण संस्थेत १९८४ ते २०१७ या काळात मराठीचे प्राध्यापक होते. सातारा, पुणे, कर्जत, श्रीरामपूर या शाखेत त्यांनी अध्यापन केले. मराठी विभाग प्रमुख म्हणून ते रा.ब. नारायणराव बोरावके महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले. डॉ. उपाध्ये यांची ५१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पुणे येथील डॉ. स्नेहल तावरे यांच्या स्नेहवर्धन प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेल्या आणि डॉ.. संजीवनी वाघ, प्रा स्वप्नील जोशी यांनी अभ्यासक्रमासाठी संपादित केलेल्या' भावलेल्या कथा' ह्या पुस्तकात ही कथा समाविष्ट आहे. डॉ. उपाध्ये यांच्या' माकडांच्या हाती शाळेची खिचडी' या कथासंग्रहातून ही कथा घेतली आहे. डॉ. उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली ०८ विद्यार्थी पीएच.डी. व १७ विद्यार्थी एम.फिल् झाले आहेत. ते बहिःशाल शिक्षण मंडळ अंतर्गत व्याख्याते आहेत. अभ्यासक्रमात कथा समाविष्ट झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. वृत्त विशेष सहयोग -

ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे, शिरसगांव, संकलन - समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close