shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शिक्षकांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार..

अकोले ( प्रतिनिधी ) कळस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल व जिल्हा गुणवत्ता यादीत आल्याबद्दल  या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता.

      यावेळी मार्गदर्शक शिक्षिका सुवर्णा जाधव, संपत भोर, विद्यार्थी वेदीका विवेक वाकचौरे ,ज्ञानदा प्रशांत वाकचौरे,गौरी विष्णू वाकचौरे,अरूधंती सुहास कातोरे,पूर्वा विकास वाकचौरे, विराज जयराम वाकचौरे,ईश्वरी प्रशांत हुजबंद,यश योगेश वाकचौरे यांचा सत्कार करण्यात आला गुणवंत विद्यार्थी
          कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ सोन्याबापू वाकचौरे गुरुजी हे होते. यावेळी सरपंच राजेंद्र गवांदे, जयकिसान दूध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे, संगमनेर साखर कारखाने संचालक संभाजी वाकचौरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ईश्वर वाकचौरे, शिक्षण विस्तार अधिकारी माधव हासे, डी. टि.वाकचौरे, माजी सरपंच यादव वाकचौरे आदि उपस्थित होते.
           यावेळी विद्यार्थ्यांना रामनाथ वाकचौरे सर व महेश वाकचौरे यांच्या वतीने अकराशे रुपये, एन. आर. वाकचौरे सर व किसनराव वाकचौरे सर यांनी रुपये दोनशे बक्षीस,कॉम्रेड गंगाधर नाना मोहिते बहुउद्देशीय सेवा भावी संस्था राजापूरयांच्या वतीने ट्रॉफी, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर वाकचौरे, शिक्षण समितीचे सदस्य इमरान शेख यांनी स्कूल बॅग व प्रकाश आल्हाट पेन, अशोक ढगे गुरुजी छत्री, भाऊसाहेब धोंडीबा वाकचौरे वृक्ष देण्यात आली.
         कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका संगीता दिघे यांनी तर सूत्रसंचालन योगेश थोरात यांनी केले. आभार स्वप्ना गुरव यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू वाकचौरे उपाध्यक्ष सारीका चौधरी मनीषा वाकचौरे सुवर्णा ढगे  शाळेतील शिक्षक माधवी गोरे, बाळासाहेब शिंदे, बाळू चौधरी, पुष्पा सूर्यवंशी, वृषाली बर्वे, हर्षल सोनवणे, यासिर सय्यद यांनी प्रयत्न केले.
close