shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शाम जरा थांबला असता..तर काय बिघडले असते बाळा!!

    


 अमळनेर:- येथील शारदा माध्यमिक विदयालयात एक फार हृदयाला वेदना देणारी घटना घडली..घनश्याम जितेंद्र महाजन नामक शाळेचा विद्यार्थी अचानक हे जग सोडून गेला. शाम नवीत शिकत होता. लहानपणापासून शांत, सोज्वळ, निरागस, सामंजस शाम गुणी विद्यार्थी होता. कोणतेही काम शिक्षकाने सांगितले की, सहज करून टाकणारा आज्ञाधारक विद्यार्थी होता. उंच, हळकुळा, गोरागोमटा, रूबाबदार दिसायचा…सर्व मुलांना एकत्रित ठेवण्याचा त्याचा स्वभाव होता. सर्व मित्रांना घेऊन तो क्रिकेट खेळायचा..सर्व शिक्षक, पालक, आईवडील यांना आदराने मान देणारा शाम आमच्यातून निघून गेला. जेष्ठ नागरिकांचे काम ऐकून त्यांचा आशिर्वाद घेणारा शाम निगर्वी विद्यार्थी होता.

    त्याला रागावलेले कुणी पाहिले नाही. विनयशीलपणा हा त्याचा गुण होता. स्काऊट असो की सांस्कृतिक कार्यक्रम त्याचा पुढाकार सर्वप्रथम असायचा..आईवडील यांना शेतात मदत करणारा शाम घरी सुध्दा घरातील कामे आनंदाने ऐकायचा…शाम तु पोरका करून गेलास रे..साऱ्या गावाला…आम्ही कुठे शोधायचे तुला बाळा! अशी तुझी अचानक एक्झिट आमच्या हृदयाला चटका लाऊन गेली…सरांनी दिलेले होमवर्क नित्य करून खेळायला जाणारा शाम आम्हाला दिसणार नाही…तो साने गुरूजी सारखा शामच होता. दुसर्‍याच्या दु:खाने द्रवित होणारा….कशी काळाने तुझ्यावर झडप घातली हे समजलेच नाही..क्रिकेटच्या खेळासाठी तु वेळ द्यायचा…शाळेसाठी खेळणारा शाम उत्कृष्ट बॅटमन होता.

    अप्रतिम खेळणं आता आम्हाला दिसणार नाही. स्वतःच बॅट व इतर साहित्य घेणारा तो एकमेव विद्यार्थी होता. शाळेत मधल्या सुटीनंतर 8 व्या तासिकेला तो जेवण करून आला..शाळेचे कपडे खराब होऊ नये म्हणून कपडे बदलवून आला. थोडे खेळल्यानंतर त्याला अचानक चक्कर यायला लागले…हे लक्षात येताच एन. डी. पाटील सरांनी त्याला पकडले. खाली पडू दिले नाही..त्यात त्याला झटके यायला लागले..सरांनी त्याला टीचर रुममध्ये नेले. डाॅक्टरांना बोलावले. त्यांनी खूप प्रयत्न केला पण त्याचे हृदयाची क्रिया काम करत नव्हती. तात्काळ त्याला अमळनेर येथे डाॅक्टर बहुगुणे यांच्याकडे हलविले. परंतू काळाने शामच्या जीवनाचे दोर कापून टाकले ते कायमचे…डाॅक्टर बहुगुणे कडून शामला ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. 



        शाम काॅट वर पहुडल्या सारखा दिसत होता. विश्वासच बसत नव्हता..त्यांच्या वडिलांनी मोठा हंबरडा फोडला..सारा आसमंत दुःखमय झाला होता. अश्रू डोळयात मावत नव्हते. शामवर केलेला काळाने आघात सहन करण्यासारखा नव्हता..त्याची निरागस मुद्रा शांत भासत होती…नियतीने खेळलेला तो डावच होता…शाळेतील शिक्षक अगदी सुन्न झाले. आप्तेष्ट दुखाश्रू ढाळत होते.. गावामध्ये सारा गाव दु:खाने बेजार झालेले..शाम कधी पहायला भेटेल या आशेने शामच्या घराजवळच थांबून होते. कसे शांत करावे शामच्या आईवडीलांना हे समजत नव्हते…शाम तु सर्वांच्या हृदयात कायमची जागा करुन गेलास..तुझा आदर्श आम्ही जपू..तुझी गरज होती रे बाळा अजून..

तू परतीची वाट का निवडली…

तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना!!!


शारदा माध्यमिक एन एम कोठारी कनिष्ठ महाविद्यालय अध्यक्ष सर्व संचालक मंडळ,मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी, संपूर्ण कळमसरे येथील समाजबांधव,शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ मंडळ कळमसरे आपल्या दुःखात सहभागी आहे…


 

                            




close