shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

गोदाम बांधकाम व बीजप्रक्रिया संच उभारणी साठी २० जुलै २०२४ पर्यंत अर्ज सादर करावेत


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा: 
अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान-कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल गळीतधान्य अभियान २०२४-२५ योजनेंतर्गत जिल्ह्यात अुनदानावर गोदाम बांधकाम व बीज प्रक्रिया संच उभारणी घटकासाठी अनुदान देण्यात येणार आहे. शेतकरी उत्पादक संघ व शेतकरी उत्पादक कंपनी यांनी गोदाम बांधकाम व बीजप्रक्रिया संच उभारणीसाठी २० जुलै, २०२४पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

जिल्ह्यासाठी २५० मे. टन गोदाम बांधकामासाठी अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान-कडधान्य ६ व राष्ट्रीय खाद्यतेल गळीतधान्य १ गोदाम बांधकामाचे भौतिक उद्दिष्ट प्राप्त आहे. प्रत्यक्ष बांधकामाच्या ५० टक्के किंवा १२ लक्ष ५० हजार जे कमी असेल अशी अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. तसेच अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान- कडधान्य 1 बीज प्रक्रिया संच उभारणी प्रकल्पाकरिता उभारणीच्या ५०  टक्के किंवा १० लाख रुपये जे कमी असेल अशी अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.

            सदर बाब ही बँक कर्जाशी निगडीत असल्याने योजनेच्या लाभासाठी अर्जदारांनी प्रस्ताव सादर करताना केंद्र शासनाच्या ग्रामीण भांडार योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राष्ट्रीयकृत बँकेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. बँकेने कर्ज मंजुर केल्यानंतर संबंधित अर्जदार कंपनी, संघ या बाबींचा लाभ घेण्यास पात्र राहील. इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करताना महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या प्राधिकृत अधिकारी अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यता प्राप्त डिझाईन्स, स्पेसीफिकेशन व खर्चाच्या अंदाजपत्रकासह अर्ज तालुका कृषी अधिकारी यांचेकडे सादर करावा. शेतकरी उत्पादक संघ व शेतकरी उत्पादक कंपनी यांनी सभासद यादी, मागील वर्षाचे ऑडीट रिपोर्ट तसेच ७/१२,८ अ सादर करणे आवश्यक असल्याचेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर 
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
close