श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगांव येथील डी पी डी सी योजनेच्या माध्यमातून बसविलेल्या सगळगिळे - जाधव (वस्तीवर) या नवीन डी पी चे नुकतेच ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना ॲड. प्रमोद सगळगिळे यांनी नवीन डी पी शेतकऱ्यांना कशी अत्यावश्यक होती याची इत्यंभूत माहिती दिली.
या डीपीमुळे सुमारे ५० शेतकऱ्यांना कायमस्वरूपी फायदा झाला आहे, यावेळी ॲड. प्रमोद सगळगिळे यांनी मनोगत व्यक्त करताना मान्यवरांच्या सहकार्यामुळे सदर डी पी ही मंजूर झाली, त्यामध्ये विशेषत पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, आमदार लहू कानडे, दिपक अण्णा पटारे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे अशी माहिती दिली. तसेच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी व समाजकल्याण विभाग अहमदनगर येथील उपआयुक्त व अधिकारी आणि कर्मचारी तसेच वृत्तपत्र प्रसार माध्यमे यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे म्हणाले तथा या प्रसंगी ॲड. प्रमोद सगळगिळे यांनी लाभार्थ्यांच्या व ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या वतीने सर्वांचे आभार मानले.यावेळी परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते. प्रकाश जाधव यांनी आभार मानले.
*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111