श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील क. जे. सोमैया कनिष्ठ महाविद्यालय श्रीरामपूर, या महाविद्यालयात गुरुपोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय माधव मुठाळ सर व त्यांचे चिरंजीव संकेत मुठाळ आणी स्नूषा सौ. तेजश्री मुठाळ हे होते.यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी त्यांनी गुरुपोर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले, यासोबतच सर्व शिक्षकांना यथोचित भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. तथा महाविद्यालयास देणगी स्वरूपात धनादेश दिला .
या कार्यक्रमास स्कूल कमिटी सदस्य नितीन गगे, माणिकराव जाधव उपस्थित होते.
सदरील कार्यक्रम हा महाविद्यालयाचे चेअरमन विजय नगरकर व प्राचार्य भुषण गोपाळे सर यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडला.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी देखील आपल्या गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे भाषण केले. शिक्षक मनोगत प्रा.चंद्रकला जाधव यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा. दिपाली तांबे व प्रा.सुवर्णा कुमावत मॅडम यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार व परिचय प्रा. योगेश शेटे यांनी करुन दिला तर अध्यक्षीय सुचना प्रा. अविनाश राऊत यांनी मांडली व त्यास अनुमोदन प्रा. शेरअली सय्यद यांनी दिले. शेवटी आभार प्रदर्शन प्रा. ताजने मंजुषा यांनी मांडले.
*वृत्त विशेष सहयोग
विजय नगरकर, श्रीरामपूर
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174112