अहमदनगर / प्रतिनिधी :
मोहरमचे औचित्य साधून वायफट खर्चास फाटा देऊन चांद तारा यंग पार्टी आणि अल्तमश जरीवाला फ्रेंडस् सर्कलच्यावतीने जिल्हा रुग्णालयातील अनाथ, गरीब, गरजूवंत रुग्णांना फळांची किट वाटण्यात आले. याप्रसंगी संस्थापक सलीमभाई जरीवाला, तन्वीर बागवान, अलतमश जरीवाला, जावेद शेख, युनुस शेख, फयाज तांबोळी, इद्रीस लोखंडवाला, रेहान जरीवाला, समीर मुन्शी, अमीर सैय्यद, जफर सैय्यद, रिजवान जरीवाला, शकील शेख, वसीम शेख, फजल कराचीवाला, वसीम तांबोळी, अरबाज बागवान, शाहिद शेख, मजीद सैय्यद, अनस शेख, अरशान शेख, हन्नान बागवान, साहिल सैय्यद, अल्फैज सैय्यद, अकील शेख व आदी चांद तारा यंग पार्टी व अल्तमश जरीवाला फ्रेंड्स सर्कलचे सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी अल्तमश जरीवाला म्हणाले, आज सण उत्सवात मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो, परंतु समाजातील गरीब गरजूंना मदत केल्यास खर्या अर्थाने या उत्सवाचा हेतू साध्य होईल. अहमदनगरचे मोहरम हे देशभर प्रसिद्ध आहेत. या उत्सवात सर्वधर्मिय सहभागी होत असतात, अन्नदान, शरबत सारखे उपक्रमातून चांगले कार्य केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून अनावश्यक खर्चास फाटा देत जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे किट वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
याप्रसंगी सलीमभाई जरीवाला म्हणाले, चांद तारा यंग पार्टी व अल्तमश जरीवाला फे्रडस् सर्कलच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक कार्याला प्राधान्य दिले जाते. मोहरम उत्सवात सर्वांचा सहभाग असावा, या भावनेतू गरजूंना काही मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या छोट्याशा कृतीतून गरजूंच्या चेहर्यावर हास्य फुलविण्याचा प्रयत्न केला असल्याचा त्यांनी सांगितले.
यावेळी तन्वीर बागवान यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. या उपक्रमाचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी कौतुक केेले.
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार आबीद दुलेखान, अहमदनगर
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111