shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्रीरामपूर जिल्ह्यासाठी १५ऑगस्टपर्यंत अल्टीमेट्म..,जिल्हा नाहीतर मतदानही नाही,संघर्ष समिती जिल्हाभर अभियान राबविणार - राजेंद्र लांडगे


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
गेल्या ४२/४३ वर्षापासून श्रीरामपूर जिल्हा मागणीसाठी शासन दरबारी अनेकदा जन आंदोलने करूनही शासन प्रतिसाद देत नाही.या पार्श्वभूमीवर शासनास १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत अल्टीमेटम देण्यात आले आहे, त्यानंतर जिल्हा नाही तर,मतदान नाही असे अभियान संपूर्ण जिल्हभर राबविणार असल्याची घोषणा श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांचे अधिपत्याखाली ठिय्या आंदोलनात करण्यात आली.

 यावेळी श्रीरामपूर प्रांताधिकारी कार्यालयातील शिरस्तेदार श्रीमती कालापुरे यांना संघर्ष समिती आणि सर्व पक्षीय नेत्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी  उबाठा शिवसेनेचे अशोक मामा थोरे,शेखर दुबैय्या, कामगार नेते नागेशभाई सावंत,कॉंग्रेसचे ज्ञानेश्वर मुरकुटे,अशोक नाना कानडे, सचिन गुजर,अरुण पा. नाईक,अण्णासाहेब डावखर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट ) चे शहराध्यक्ष लकी शेठी,कार्याध्यक्ष भागचंद औताडे,विधिज्ञ सुभाष जंगले,मनोज हासे, बाबा शेख,विजय नगरकर, अभिजित बोर्डे,राजेंद्र गोरे, चंद्रशेखर आगे,अनिस पठाण विजय शेलार,किशोर फाजगे, दिपक पाटील,सलीम शेख, मंगेश छतवाणी,संजय शेजूळ,जहांगीर पठाण,दीपक भांड,विजय बडाख,सलीम शेख आदिसह मोठ्या संख्येने समिती सदस्य उपस्थित होते.

यावेळी कॉंग्रेसचे ज्ञानेश्वर मुरकुटे म्हणाले की, श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी सर्व बाबींचे निकष पूर्ण झालेले आहेत.महाराष्ट्र राज्य शासन सध्या नवीन जिल्हे होण्यासाठी सकारात्मक पाऊले उचलत आहे.त्यात श्रीरामपूरचासुद्धा विचार करावा ही संपूर्ण श्रीरामपूर शहर व तालुक्याची मागणी आहे.कामगार नेते नागेशभाई सावंत म्हणाले प्रभू श्रीरामचंद्र यांच्या नावाने पावन झालेले श्रीरामपूर शहर हे महराष्ट्र राज्यात ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते.गेल्या ४० वर्षापूर्वीच राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार यांनी सोनई येथे सहकार परिषदेत घोषणा केली होती.परंतु नंतरच्या काळात दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा अशी अवस्था निर्माण झाली. त्यानंतर श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी गळती लागली. परंतु श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीने महाराष्ट्र शासनाच्या मुख्य पटलावर आणण्यासाठी या विषयावर गेल्या ११ वर्षापासून सातत्याने वेगवेगळ्या लोकशाही मार्गाने आंदोलने करीत हा प्रयत्न सुरूच ठेवला ही श्रीरामपूर जिल्हा होण्याच्या दृष्टीने जमेची बाब आहे.आणि आता शासनाने याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता श्रीरामपूरकरांचे स्वप्न साक्षात उतरविणेसाठी येत्या १५. ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा करावी असेही ते म्हणाले.

यावेळी उबाठा शिवसेनेचे अशोक मामा थोरे म्हणाले की, श्रीरामपूर हेच जिल्ह्याचे ठिकाण सर्वार्थाने योग्य आहे. श्रीरामपूर जिल्हा झाला तर यातून हजारो तरुणांना रोजगार मिळेल कारण श्रीरामपूर शहरात अनेक प्रकारच्या सुख सुविधा सर्व आजी - माजी भूमिपुत्रांनी निर्माण करून ठेवल्या आहेत. त्यामुळे श्रीरामपूरच जिल्हा व्हावा ही एक निष्ठावंत शिवसौनिक म्हणून आमची मागणी असल्याने ते म्हणाले.शेवटी  सामाजिक कार्यकर्ते मनोज हासे यांनी आभार मानले.

*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close