१५ ऑगस्ट २०२४ रोजी साप्ताहिक ताजी खबरे हे वाचनीय वर्तमानपत्र आपल्या नियमित अंक प्रकाशनाचे १३ वर्षे पूर्ण करून १४ व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वर्धापनदिन विशेषांक प्रकाशित करण्यात येत आहे.
या विशेषांकासाठी आपले छोटे लेख, कथा, कविता, वात्रटिका,विनोद, चारोळ्या, व्यंगचित्रे आदि साहित्य यासोबतच साप्ताहिक ताजी खबरे वर्तमानपत्राबाबतच्या आपल्या प्रतिक्रिया दिनांक २० जुलै २०२४ पर्यंत
"साप्ताहिक ताजी खबरे" कार्यालय :- मदिना चौक शेवगांव जि. अहमदनगर - मो.9881166423, tajikhabareshevgaon@gmail.com या पत्त्यावर पाठवावेत असे संपादक मंडळाकडून आवाहन करण्यात आले आहे.
सदरील वर्धापन दिन विशेषांक १/४ पुस्तकाच्या आकारात रंगीत छपाईत प्रसिद्ध केला जाणार आहे. करीता जाहिरातीदार बंधू - भगीनींनी देखील संपर्क करावा असेही संपादक मंडळाकडून म्हटले गेले आहे.
संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111