अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
युथ फेस्टीव्हलअंतर्गत जिल्हास्तरीय रेड रन स्पर्धेचे १२ जुलै रोजी तर रेड रिबन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे १५ जुलै, २०२४ रोजी आयोजन करण्यात आले असुन या स्पर्धांमध्ये अधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
रेड रन स्पर्धेचे आयोजन १७ ते २५ वर्षे वयोगटातील रेड रिबन क्लब असणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी असणार असुन ही स्पर्धा पाच किलोमीटर अंतराची असणार आहे. ही स्पर्धा पुरुष व महिला या दोन गटांमध्ये घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी https://forms.gle/582T1Z47nPbvCEmZ6 या लिंकद्वारे करता येऊ शकणार असुन ही लिंक ५ जुलै ५ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत खुली राहणार असुन १२ जुलै २०२४ रोजी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. महिला व पुरुष गटामध्ये स्पर्धेत यशस्वी ठरणाऱ्यांना प्रथम,द्वितीय व तृतीय असे बक्षीसही देण्यात येणार आहे.
रेड रिबन प्रश्नमंजुषा स्पर्धा ही १३ ते १७ या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत १०० विद्यार्थ्यांनाच सहभागी होता येणार असुन या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी https://forms.gle/QWWd7buvJdFFbb8b8 या लिंकवर करता येऊ शकणार असुन ही लिंक ५ जुलै २०२४ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत खुली राहणार असुन १५ जुलै, २०२४ रोजी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. विजेत्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षिसेही देण्यात येणार आहेत.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111