shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन: अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे- प्राचार्या डॉ.सुनीता गायकवाड

श्रीरामपूर / प्रतिनिधी: अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुण्यतिथी निमित्त महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुनीता गायकवाड यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी प्राचार्या डॉ.गायकवाड म्हणाल्या की, अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत अनेक कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा कादंबरीला राज्य सरकारच्या उत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे. 


साठेंच्या पोवाडा आणि लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरामध्ये' त्यांनी आपल्या समुदायाला पूर्ण भुखमारीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढिवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकिराला चित्रित केले. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. अशा या थोर साहित्यिकाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे असे मत डॉ.गायकवाड यांनी व्यक्त केले.
 यावेळी प्रा.दिलीप खंडागळे, प्रा.भिमा शिंदे, प्रा.ज्ञानेश्वर खिलारी, प्रा.राणी पटारे, प्रा.संगीता खंडिझोड, प्रा.पायल सुराणा, प्राध्यापक, प्राध्यापिका, कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब पटारे, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर 
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close