श्रीरामपूर / प्रतिनिधी:
ग्रामीण भागातील साहित्यिकांचे अनुभवविश्व वास्तवदर्शा असते, असे अनुभवशील लेखन करणारे डॉ. बाबुराव उपाध्ये यांची कथा अभ्यासक्रमात समाविष्ट झाली, हे विशेष गौरवास्पद असल्याचे मत मराठी साहित्य कथालेखक, समीक्षक, प्रकाशक डॉ. शिवाजी काळे यांनी व्यक्त केले.
साहित्य परिवार, टाकळीभान यांच्यातर्फे डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या' माकडांच्या हाती शाळेची खिचडी' या कथासंग्रहातील -- आणि कमल सापडली' ही कथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत एस.पी. कॉलेज, पुणे स्वायत्त महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष कला शाखेत अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व परिसंवाद प्रसंगा डॉ. शिवाजी काळे बोलत होते. साहित्य परिवाराचे संस्थापक,अध्यक्ष प्रा. पोपटराव पटारे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून उपस्थितांचा सत्कार केले. यावेळी माजी प्राचार्य टी.ई. शेळके, प्रा. शिवाजीराव बारगळ, सौ. सुनीताताई पोपटराव पटारे, सौ.अंजली हेमंत पटारे आदी उपस्थित होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा सन्मान प्रा. पोपटराव पटारे यांनी केला. डॉ. उपाध्ये यांनी आपल्या कथेची निर्मिती प्रक्रिया सांगून'-- आणि कमल सापडली' या कथेत मुली पळविण्याचा, त्यातील संघर्ष आणि गावातील तरुणांमुळे झालेली कमलची सुटका कथाचित्रण आहे. श्रीरामपूर, हरेगांव, उंदीरगांव, माळेवाडी, सराला परिसराचे चित्रण आहे, अशी देऊन पुणे येथील डॉ. स्नेहल तावरे यांच्या स्नेहवर्धन प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेल्या' भावलेल्या कथा' अभ्यास पुस्तकात ही कथा समाविष्ट असल्याची माहिती देऊन साहित्य परिवाराच्या उपक्रमाबद्दल धन्यवाद व्यक्त करून कौतुक केले.
प्राचार्य शेळके, प्रा. बारगळ यांनी कथा पुस्तकाबद्दल कौतुक केले. सौ. सुनीताताई पटारे यांनी आभार मानले.
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे- शिरसगाव
सहयोगी : स्वाभिमानी संपादक सेवा संघ
संकलन: समता न्यूज सर्व्हिसेस,श्रीरामपूर - 9561174111