shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापिठात कवी संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न...!

*छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये९० कवींनी सादर केल्या कविता

*उदघोष अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकल्पनेचे अनेकांनी केले कौतुक

उद्धव फंगाळ / मेहकर:
सातारा - येथील येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजचा वर्धापन दिन उत्सव  निमित्ताने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषा मंडळ व छत्रपती शिवाजी कॉलेजचा भाषा विभाग व  शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील माझं कवितांचं गाव जकातवाडी हा समुह या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने‘ उदघोष अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा’ या संकल्पनेवर आधारित कवी संमेलन शनिवार दिनांक २० जुलै २०२४ रोजी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा  येथील बॅरिस्टर पी.जी. पाटील सभागृहात नुकतेच संपन्न झाले. प्रारंभी उद्घाटन समारंभात माझा कवितांचं गाव जकातवाडी या समूहाचे अध्यक्ष प्रल्हाद पार्टे म्हणाले की ‘ ही कर्मवीरांची भूमी आहे. आपण आपली कवितेची विचारधारा सर्वत्र पोचवली पाहिजे.आपल्या कविता जनमानसात जायला हव्यात. महाविद्यालयाने समाजाकडे पोचायला हवे. आपण केवळ आनंदासाठी कविता करत नाही. हिंसा नको,कर्मकांड नको, माणसातील माणुसकी मला पाहिजे हा ध्यास आपण घेतलेला आहे. आपल्या कविता जनमानसात पोचायला पाहिजेत. कविता पोचली तर कवी पोचणार आहे. शिवाजी कॉलेजमधून प्रेरणा घेऊन कवितेचं गाव आपण पुढे न्यायचे आहे .असे ते म्हणाले.
यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे ,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापिठाचे मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा.डॉ.अनिल वावरे तसेच आंतरविद्या शाखा विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ.रघुनाथ साळुंखे, प्रा. डॉ.सुभाष वाघमारे ,प्रा. डॉ. सविता मेनकुदळे, प्रा.डॉ. रोशनआरा शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

            शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे  अध्यक्ष प्रा.डॉ.भरत जाधव म्हणाले,‘ मी ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. कर्मवीरांची दृष्टी खूप महत्वाची होती. आपण खरेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगत आहोत का,हा प्रश्न आहे. जुन्या नव्याचां संगम या कवी संमेलनात होत आहे. प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी अनेक कार्यक्रम घेत प्रोत्साहन दिले आहे. कुलकर्णी मदम मला सर्वत्र कार्यक्रमात दिसतात. नखावर लावायची शाई तेवढीच आमची लोकशाही हे फ.मु.शिंदे यांनी सांगितले आहे. समाजामध्ये विध्वंस घडतो तेंव्हा साहित्यिकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करून हा विध्वंस थांबवला पाहिजे. समोरच्या माणसाच्या ह्दयात कविता पोचली पाहिजे . कवितेचे प्रकार समजून घेतले पाहिजे, या पुढच्या काळात कविता कशी लिहायची याची कार्यशाळा आपण घेणार आहोत. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाची संशोधन पत्रिका जगभरात पोचत आहे. साहित्यिक फक्त बोलत नाहीत तर ते करून दाखवतात. तुमच्या प्रत्येक शब्दाला कर्तुत्वाचे मोल यावे असेही ते म्हणाले.             
अध्यक्षीय मनोगतात  प्राचार्य  डॉ. राजेंद्र मोरे म्हणाले की, मला सतत तुमच्या सोबत रहावे वाटे. कवी कल्पनेच्या सहाय्याने नवनव्या गोष्टी सुचवत असतो. हे कवी संमेलन सातारा जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता बार्शी, धाराशिव येथून कवी आले आहेत. कवी समाजात विधायक दिशा देत असतात. उद्घोष अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय अतिशय समर्पक असून सदर काळात या चिंतनाची गरज आहे. शिक्षण व्यवस्थेची आणि समाजाची नाळ तुटत चाललीय ती जोडायचे काम छत्रपती शिवाजी कॉलेज करीत आहे. २७ ला आम्ही माजी विद्यार्थी मेळावा घेत आहोत .तसेच ८ व ९ ऑगस्टला माजी सैनिक मेळावा ठेवून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. उद्योजक मेळावा घेत आहोत. प्रत्येक गावात आम्ही वृक्षारोपण घेत आहोत. डोळेगाव ला आम्ही ५०० - ५५० झाडे लावली आहेत.  मला कवितेचे गाव जकातवाडी समुहाचे कौतुक करावे वाटते .कवितेच्या प्रसारासाठी ते मोठे योगदान देत आहेत. तसेच दिवाळी नंतर अनेक कवीना बोलवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
                  या उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले.  माझं कवितेचं गाव जकातवाडी या संस्थेच्या वतीने ई - बुक प्रकाशित करण्यात आले. ई - बुकचे संपादन सुषमा आलेकरी यांनी केले. तर प्रा.डॉ.कांचन नलवडे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. विद्या नावडकर यांनी केले. पाटण, कराड, फलटण, खंडाळा, कराड, सातारा इत्यादी विविध तालुक्यातील कवी उपस्थित होते. यात महिला कवींचा मोठा सहभाग होता. कवी संमेलनाचे निवेदन,कवी किशोर धरपडे ,वसुंधरा निकम, क्रांती पाटील ,गणेश शेंडे ,इत्यादींनी केले. महाविद्यालयातील कवी विद्यार्थी व प्राध्यापक यांनीही कवी संमेलनात सहभाग घेतला. रिमझिम पावसात सामाजिक कवितेतील विविध भावनांनी वातावरण जोशपूर्ण होत उत्साही राहिले.

*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close