shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

खा.गोविंदराव आदिक पतसंस्थेने सभासदांचे हीत जोपासतानाच सामाजिक उपक्रम राबवावे - अविनाश आदिक



श्रीरामपूर / प्रतिनिधी:
खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची २८ वी सर्वसाधारण सभा काँग्रेस भवन श्रीरामपूर येथे नुकतीच संपन्न झाली,या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व संस्थेचे सचिव अविनाश आदिक माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक,सहसचिव ऍड.जयंत चौधरी, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य हंसराज आदिक, सुनील थोरात आदि मान्यवर उपस्थित होते.

          राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व संस्थेचे सचिव अविनाश आदिक यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांचे हीत जोपासण्याबरोबरच येणाऱ्या काळात ग्लोबल वार्मिंग चा धोका ओळखुन निसर्गाचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी वृक्षारोपण सारखे उपक्रम हाती घेऊन समाजाला दिशा देण्याचे काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
        माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी पतसंस्थेने काटकसरीने कारभार केल्यामुळेच चांगला नफा झाला याबद्दल समाधान व्यक्त केले. घरातील महिला अगदी काटकसरीने आपले कुटुंबाचे आर्थिक गणित करत असते त्यामुळे येणाऱ्या काळात संचालक मंडळांमध्ये महिलांना जास्तीत जास्त स्थान मिळावे असे सांगितले.
         सहसचिव ऍड. जयंंत चौधरी यांनी पतसंस्थेने चांगल्या कारभाराची परंपरा कायम ठेवल्याबद्दल सर्वांचे कौतुक करुन अभिनंदन केले.
      प्रारंभी खा. गोविंदरावजी आदिक व माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
    पतसंस्थेचे चेअरमन शामराव तऱ्हाळ यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक व संस्था कामकाजाचा अहवाल सभेपुढे सादर केला.
याप्रसंगी सर्व संचालक, सभासद बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते,आभार प्रदर्शन संगीता घोडे यांनी केले.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगाव 
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close