शिर्डी अंतरराष्ट्रीय विमानतळ समन्वयक पदाची जबाबदारी
शिर्डी प्रतिनिधी : ( नानासाहेब शिंदे)
सामाजिक बातमी
एयरपोर्ट एव्हीएश्न एम्प्लॉईस युनियनचे अध्यक्ष डॉ नितीन जाधव यांनी तरूण कामगार नेते डॉ अमित भोसले यांना एयरपोर्ट एव्हीएश्न एम्प्लॉईस युनियनच्या राष्ट्रीय सचिव पदी नियुक्त केले. कामगार क्षेत्रातील अनुभव आणि योगदान पाहून डॉ अमित भोसले यांची नियुक्ती करण्यात आल्याचे डॉ नितीन जाधवयांनी सांगितले.
गेली बावीस वर्ष डॉ अमित भोसले कामगार क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अनेक संघटनांमध्ये महत्वाच्या पदांवर काम केले आहे. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे. सध्या ते भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडीत मुंबई प्रदेश महामंत्री पदावर कार्यरत आहत. कामगारांसाठी अनेक कायदेशीर लढे लाढून व आंदोलनं करून डॉ अमित भोसलेकामगारांना न्याय मिळवून दिले आहे. सामान्य कामगारांच्या विश्वासाचे नेतृत्व असलेल्या डॉ अमित भोसले यांची नियुक्ती झाल्यामुळे अनेक कामागारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
शिर्डी विमानतळ येथे स्थानीकांना हक्क मिळवून देणार डॉ अमित भोसले शिर्डी विमानतळ हे भारतातील अतिमहत्वाचे विमानतळ आहे. येथे दररोज हजारों साईभक्त प्रवास करतात. हे भारतातील सर्वात मोठे कार्गो विमानतळ ही आहे. येथे होणाऱ्या प्रत्यक भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे. तर येथे होणाऱ्या सर्व प्रकारच्या ठेक्यांमध्ये स्थानिक ठेकेदारांना प्राधान्य दिले गेले पाहिजे, हा स्थानिकांचा हक्क असून त्यासाठी सर्व प्रथम काम करणार असल्याचे डॉ अमित भोसले यांनी सांगितले.
डॉ अमित भोसले यांना नियुक्ती पत्र प्रधान कताराना एयरपोर्ट एव्हीएश्न एम्प्लॉईस युनियनचे राष्ट्रीयअध्यक्ष डॉ नितीन जाधव आणि राष्ट्रीय सरचिटणीस मोहम्मद सारवार.