shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हा कार्यकारीणी सदस्य पदी सौ.चंद्रकला गायधने


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
 श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगांव येथील कामगार पोलीस पाटील सौ. चंद्रकला संजय गायधने यांची जिल्हा पोलिस पाटील संघटना जिल्हा कार्यकारीणी सदस्य पदी निवड करण्यात आली. 

सौ.गायधने यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस पाटील संघटना उपाध्यक्ष म्हणून २० वर्षे कामकाज सांभाळले आहे,त्यांच्या या कार्याची दखल घेत वरिष्ठ स्तरावरून त्यांची जिल्हा कार्यकारीणी सदस्य पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी (dysp) बसवराज शिवपुजे, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके, दादाभाई मगरे,पोलीस हवालदार संतोष परदेशी, पो.ना.किरण टेकाळे, पत्रकार राजेंद्र देसाई  आदींनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
वृत्त विशेष सहयोग
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close