shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अवैध व्यवसायाविरुद्ध भीमशक्तीचे उपोषण पोलिस कारवाईच्या अश्वासनानंतर स्थगीत


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्यातील बेलापूर परिसरात अवैध व्यावसायांना मोठा उत आला असल्याने भीमशक्ती चे सचीव अल्ताफ शेख यांनी उपोषण छेडले होते, मात्र बेलापुर व परिसरातील अवैध व्यवसाय पुर्णपणे बंद केले असुन ते व्यवसाय सुरु होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे अश्वासन श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिल्यानंतर भिमशक्ती सामाजिक संघटनेचे सचिव अल्ताफ शेख यांनी आपले उपोषण स्थगीत केले आहे.

बेलापुर व परिसरातील अवैध व्यवसाय बंद व्हावेत या मागणीसाठी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे सचिव अल्ताफ शेख यांनी आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरु केले होते आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता.अवैध व्यवसायामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत होते, गावठी दारु, मटका, बिंगो जुगार, गुटखा,अवैध वाळु उपसा यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होवून वाममार्गाकडे चालली होती, त्यामुळे हे सर्व अवैध व्यवसाय बंद करावेत या मागणीसाठी अल्ताफ शेख यांनी उपोषण सुरु केले होते. सर्वांच्या विनंतीवरुन व पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिलेल्या अश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आले,
 या वेळी बोलताना अल्ताफ शेख यांनी सांगितले की, व्यसनाधिनतेमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे, त्यामुळे हे व्यवसाय कायमचे बंद व्हावेत या मागणीसाठी मी उपोषणास बसलो होतो, परंतु सर्व ग्रामस्थांसमक्ष पोलीस निरीक्षक श्री.देशमुख यांनी 
अवैध व्यवसायाविरुद्ध कडक कारवाईचे अश्वासन दिल्यामुळे हे उपोषण मी स्थगीत करत आहे, जर हे व्यवसाय पुन्हा सुरु झाले तर मी पुन्हा उपोषणास बसेल असेही शेख यांनी सांगितले. या वेळी गावातील महीलांनी शेख यांनी समाजपयोगी कार्य हाती घेतले असुन दारु बंद झाली तर अनेकांचे संसार सुरळीत चालतील असे सांगितले, यावेळी  जि.प. सदस्य शरद नवले, सुनिल मुथा, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, हाजी ईस्माईल शेख, उपसरपंच मुस्ताक शेख, भिमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर, ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई, भाऊसाहेब तेलोरे, मोहसीन सय्यद, विजय शेलार, विशाल आंबेकर, बाळासाहेब दाणी, महेश कुऱ्हे ,ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक, सुरेश अमोलीक, राजु शेख, जब्बार आतार, शफीक आतार, शफीक बागवान, समीर जहागीरदार, अब्रार सय्यद, गोपी दाणी, रफीक शहा, समीर पठाण, सचिन जाधव, मोहसीन पठाण, वसीम आतार, आसिफ शेख, अब्दुल शेख,बिलाल बागवान आदि उपस्थित होते.

*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार देवीदास देसाई - बेलापूर 
*सहयोगी*
स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close