सातारा / प्रतिनिधी:
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील मराठी विभागात एम.ए.भाग १ चे प्रवेश सुरु झाले असून विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी केलेले आहे. विद्यापीठातील मराठी विभागात नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला असून विद्यार्थ्यांचे भाषा विषयक कौशल्य वाढवणाऱ्या विविध घटकांचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे.एम.ए.मराठी विषयाचा प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही शाखेचा कोणत्याही विषयाचा पदवीधर या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतो.
मराठी ही महाराष्ट्राची भाषा असून तिचे जतन व संवर्धन करण्यासाठी पदवी,पदव्युत्तर वर्गात मराठीचे अध्यापन व पीएच.डी पदवी करिता संशोधन सध्या मराठी विभागात सुरु आहे. मराठी विभागात सतत वेगवेगळे उपक्रम व कार्यक्रम घेतले जात असून मराठी विभागाचे सामंजस्य करार, राणी चन्नमा विद्यापीठ बेळगावचा मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर, सरकारी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सांखळी गोवा, दैनिक सकाळ कार्यालय सातारा, यां संस्थाशी सामंजस्य करार केलेला असून समाज उपयोगी, अनेक कार्यक्रम घेतले जात आहेत. तसेच बोली भाषा संकलन व विस्तार कार्यासाठी लोकसेवा परिवार सामाजिक संस्था अंगापूर यांचेशी करार केलेला आहे. मराठी ग्रंथ असलेले समृद्ध शिवाजी ग्रंथालय महाविद्यालयात आहे. महाविद्यालयात कमवा आणि शिका योजना कार्यरत असून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याची इच्छा असल्यास कमवा आणि शिका योजनेत सहभागी होता येते. मराठी विभागातील प्रवेश माहितीसाठी मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे 9890726440 यांचेशी संपर्क करावा असे कळविण्यात आले आहे.
*प्रा.डॉ.सुभाष वाघमारे
प्राध्यापक आणि मराठी विभाग प्रमुख,
पदवी व पदव्युत्तर मराठी अभ्यास व संशोधन केंद्र, प्रसिद्धी विभागप्रमुख - सातारा
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111