shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षातर्फे नगरपरिषदेला निवेदन सादर...

धरणगाव नगरपरिषदेचा कारभार वाऱ्यावर - गुलाबराव देवकर.


धरणगाव - येथील नगरपरिषदेत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली विविध पायाभूत सुविधांचा संदर्भात निवेदन देऊन जाब विचारण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षातर्फे नगरपरिषदेला निवेदन सादर...

               याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगरपरिषद धरणगाव मार्फत १० ते १२ दिवसांआड होणाऱ्या पाणीपुरवठा गढूळ आणि दूषित स्वरूपाचा असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील पाईपलाईन च्या कामांमुळे वारंवार खोदकाम केल्याने ठिकठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून नागरिकांना चालणं देखील मुश्किल झालं आहे. बंद पडलेले पथदिवे, तुडुंब भरलेल्या गटारी इ. अनेक समस्यांच्या संदर्भात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी यांना निवेदन सादर करण्यात आले. नगरपरिषदेच्या गलथान कारभाराबाबत बोलतांना श्री.देवकर यांनी प्रशासनाला कडक शब्दात जाब विचारला. नगरपरिषदेचा कारभार वाऱ्यावर, अधिकारी दौऱ्यावर आणि गावातील नागरिक परिस्थितीने त्रस्त आहेत. नागरिकांच्या समस्या प्राधान्यक्रमाने सोडविल्या नाहीत तर आम्ही तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभे करू, असा इशारा देखील देवकरांनी दिला. 

               याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, जेष्ठ नेते मोहन पाटील, तालुका कार्याध्यक्ष अरविंद देवरे, काँग्रेस युवक शहराध्यक्ष भूषण भागवत यांच्यासह अमोल हरपे, नारायण चौधरी, रमेश महाजन, अशोक जाधव, गोविंद पाटील, चेतन पाटील, सागर महाले, वैभव बोरसे, अतुल वाघ, निखिल पाटील, विनित पाटील, सागर चव्हाण, प्रफुल पवार, दिनेश भदाणे, रामकृष्ण मराठे, अशोक पाटील, दुर्गेश चौधरी, नितीन पाटील, गौरव पाटील, जयेश पाटील, चंपालाल भदाणे, रमजान शाह, सचिन पाटील, किशोर भदाणे, निखिल भदाणे, विनायक पाटील यांच्यासह गावातील नागरिक तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

close