shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

एक हात मदतीचा वसतीगृहातील गरजू शालेय विद्यार्थ्यांना


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर शहरातील सन्सिद्धी फाउंडेशन तर्फे डीडी काचोळे विद्यालय श्रीरामपूर येथील गुरूकूल वस्तीगृहातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शालेय साहित्यामध्ये वही आणि पेनाचा समावेश होता.

यावेळी संसिद्धी फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश करवा यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.सचिव सौ. राधिका करवा यांनी सांगितले की, शिक्षणाने माणूस किती मोठा होतो हे विद्यार्थीना पटवून दिले. खजिनदार दिगंबर सोडणार, सदस्य समर्थ सोनार तसेच शाळेचे मुख्याध्यापक सुनिल साळवे सर आणि वस्तीगृह अधीक्षक महेंद्र भराड सर, गोविंद जाधव सर आदी उपस्थित होते. नानासाहेब मुठे सर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार मुख्याध्यापक सुनिल साळवे सर यांनी मांडले.

वृत्त विशेष सहयोग- 
दिपक कदम श्रीरामपूर,
संकलन: समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
close