अहमदनगर जि.मा.का. वृत्तसेवा:
कर्मचारी भविष्य निधी संघटन यांच्यामार्फत निवृतीवेतन धारक आणि कंपनी मालकासाठी प्रत्येक महिन्यात 'निधि आपके निकट' हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून या महिन्यात दि. २९ जुलै २०२४ रोजी सकाळी १०-०० वाजता या कार्यक्रमाचे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि ॲग्रिकल्चर, एमसीसीआयए बिल्डिंग,प्लॉट क्र. पी 86, अहमदनगर येथे आयोजन करण्यात आले आहे.
ज्या सदस्यांच्या भविष्य निधिबाबत काही अडचणी असतील त्यांनी संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन मंजुषा जाधव, क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त, जिल्हा कार्यालय, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:* समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111