shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्री क्षेत्र सराला बेट गोदावरी धाम पायी दिंडी सोहळ्याचे माऊली वृद्धाश्रमात भव्य स्वागत


 शौकतभाई शेख/ श्रीरामपूर
श्री क्षेत्र सराला बेट गोदावरी धाम पायी दिंडी सोहळ्याचे शिरसगाव हद्दीतील नेवासा रोड रेल्वे ओव्हर ब्रिज या ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.


 अनाथ निराधार गरजु तसेच लहान मुलांचे संगोपन करणे ही बाब कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांनी केले,आश्रमाच्या वतीने सुभाष वाघुंडे तसेच कल्पना वाघुंडे यांनी ह भ प महंत रामगिरीजी महाराज यांचा  सन्मान केला. परिसरात सकाळ पासुन आनंददायी वातावरण असल्याने सडा, रांगोळी, सुशोभिकरण करण्यात आले होते. विठ्ठल माऊलीच्या गजरात परिसर दणदणुन गेला होता, या दिंडी  सोहळ्यामध्ये साधारण दोन हजार भाविक सहभागी झाले असून शिस्त बद्धरित्या दिंडीचे आयोजन तसेच रथावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असल्याने विश्वस्त मधुकर महाराज कडलग यांना सन्मानित करण्यात आले. प्रसंगी हभप दत्तात्रेय बहिरट महाराज तसेच  आश्रमीय भक्त गण प्रमुख उपस्थित होते.  कार्यक्रमासाठी सुभाष  वाघुंडे, राजेन्द्र देसाई,अरूण विसपुते, भागवत मुठे, श्री. गिरमे, दत्तात्रेय खिलारी,  दिनेश जेजुरकर, शुभम नामेकर, संतोष भालेराव, कल्पना वाघुंडे,वंदना विसपुते प्रयत्नशील होते.श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचालन प्रा डॉ बाबुराव उपाध्ये यांनी केले तर सुभाष वाघुंडे यांनी आभार मानले.

पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव,
संकलन: समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
close