shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

इंदापूर महाविद्यालयात प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020: अंमलबजावणी कार्यशाळेचे गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत आयोजन

इंदापूर महाविद्यालयात प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020: अंमलबजावणी कार्यशाळेचे गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत  आयोजन 
इंदापूर :
येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाद्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियोजन आणि विकास विभागाअंतर्गत गुणवत्ता सुधार योजनेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्यासाठी 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० : संरचना आणि अंमलबजावणी' या विषयावरील एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती या कार्यशाळेचे निमंत्रक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी दिली. 
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  हर्षवर्धन पाटील यांच्या दिशानिर्देशानुसार इंदापूर तालुक्यातील महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारी यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे स्वरूप आणि अंमलबजावणी कशी करावी हे समजावे या उद्देशातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. 
या कार्यशाळेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. देविदास वायदंडे, विद्यापीठाच्या आय. क्यू .ए. सी. चे संचालक डॉ. संजय ढोले, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद पाटील हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाच्या आय. क्यू. ए. सी. चे प्रमुख डॉ. शिवाजी वीर आणि डॉ. संदीप शिंदे करणार आहेत.
close