इंदापूर तालुका विकास आघाडीच्या 4 शाखांची मंगळवारी एकाच दिवशी उद्घाटने संपन्न !
-हर्षवर्धन पाटील विधानसभेत पाठविण्याचा निर्धार
-करेवाडी, भावडी, रुई, पळसदेवला शाखा
इंदापूर - प्रतिनिधी दि.7/8/24
इंदापूर तालुका विकास आघाडीच्या करेवाडी-बनकरवाडी, भावडी, रुई, पळसदेव या 4 शाखांची एकाच दिवशी उत्साही व जोशपूर्ण वातावरणामध्ये मंगळवारी (दि.6) उद्घाटने करण्यात आली. सध्या इंदापूर तालुक्यातील गावो-गावचे कार्यकर्ते सक्रिय झाले असून, विकास आघाडीच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेत पाठविण्याचा निर्धार या शाखा उद्घाटन प्रसंगी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
करेवाडी-बनकरवाडी, भावडी, रुई, पळसदेव या शाखांच्या उद्घाटन कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी जोशपूर्ण भाषणे केली. हर्षवर्धन पाटील हेच इंदापूर तालुक्यासाठी सक्षम नेतृत्व असून, गेल्या दहा वर्षात तालुका हा सर्वांगीण विकास कामांमध्ये मागे राहिला आहे. राज्यपातळीवर नेतृत्व करण्याची धमक असलेले हर्षवर्धन पाटील यांना जीवाचे रान करून विधानसभेत पाठविण्याचा निर्धार या शाखांच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
बावडा गावात विकास आघाडीची पहिली शाखा काढल्यानंतर, इंदापूर तालुक्यात गावागावात शाखा काढण्याची मोहीम जोरदारपणे सुरू आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या 21 ऑगस्ट रोजी असलेल्या वाढदिवसापर्यंत, इंदापूर तालुक्यात विकास आघाडीच्या 100 पेक्षा जास्त शाखा काढणार असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले
------------------------------------------