शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
शैक्षणिक बातमी
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथील मुख्याध्यापक उमेश माळी व प्राचार्य मनेष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभाग प्रमुख प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी मराठी विभागाच्या वतीने ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर येथील राजीव पाटील यांचे क्षयरोग, लक्षणे, निदान, उपचार या विषयावर तर प्रांजली जोशी यांचे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथींचे आजार, खबरदारी,व घ्यावयाची काळजी या विषयावर तर अमोल भोये यांचे किशोरवयीन मुलांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शनपर शिबीराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक व सेवा निवृत्त शिक्षक विजयराव सोनवणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक उमेश माळी, प्राचार्य मनेष माळी, जेष्ठ शिक्षक झेड.एम.गवळी,प्रा.जे.पी.सोनवणे,प्रा.गणेश भावसार,प्रा.पोर्णिमा भामरे,प्रा.प्रविण पगारे हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांचा श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
राजीव पाटील यांनी क्षयरोग लक्षणे, निदान, उपचार आणि औषध पध्दती या बाबत मार्गदर्शन केले.प्रांजली जोशी यांनी पावसाळ्यात उद्भवणाऱे साथीचे आजार,लक्षणे, निदान, उपचार व घ्यावयाची दक्षता या बद्दल तर अमोल भोये यांनी किशोरवयीन मुलांच्या आरोग्यावर व किशोर,किशोरी च्या समस्यांवर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश माळी यांनी तर सूत्रसंचालन प्रा.विजय ठाकरे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.प्रविण पगारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक गणेश नेरकर,शरद सुर्यवंशी,विजय ढोले,प्रा.भिकन पारधी,प्रा.वसंत गावीत,अधिक्षक सचिन साळुंखे, भालचंद्र घरटे व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी परिश्रम घेतले.