shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

बेलापूरकरांच्या अभुतपुर्व स्वागत सत्काराने करण ससाणे, हेमंत ओगले भारावले


शेतकरी युवक संवाद यात्रा;
 अभुतपुर्व मोटारसायकल रॅली

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी युवक संवाद यात्रेनिमीत्त बेलापूर येथे मंगळवार ६ ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या भव्य मोटारसायकल रॅलीची चांगलीच छाप पडली. हेमंत ओगले यांच्या शेतकरी युवक संवाद यात्रेस मोठा प्रतिसाथ मिळत असल्याची चर्चा उपस्थित नागरिकांमध्ये होती.

   सहा दिवसांपासून अखंडपणे ही यात्रा सुरू आहे. तालुक्यातील गावागावात जाऊन शेतकरी आणि युवकांशी संवाद साधला जात आहे.  सुशिक्षित व सुसंस्कृत उमेदवार हेमंत ओगले यांची मतदार संघातील घराघरात नुसती ओळखच झाली नसून, मंगळवारी ६ ऑगस्टची मोटार सायकल रॅली पाहून हेमंत ओगले यांना श्रीरामपूर विधानसभेला उत्तम मतदान होण्याची खात्री अनेकांनी बोलून दाखवली आहे.

 बेलापूरकरांच्या वतीने मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. करण ससाणे आणि हेमंत ओगले यांच्यावर प्रेम करणारे शेकडो युवक मोटारसायकल घेऊन सायंकाळी सहा वाजता येथील साईबाबा मंदीर कॉर्नर येथे उपस्थित झाले. करण ससाणे, हेमंत ओगले यांचे आगमन होताच करण ससाणे तुम आगे बढो, हेमंत ओगले तुम आगे बढोच्या  जोरदार जयघोष करत त्यांचे स्वागत केले. या दरम्यान स्व. जयंतराव ससाणे यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते या मोटारसायकल रॅलीत त्यांचा फोटो झळकावत होते. करण ससाणे, हेमंत ओगले यांचे आगमन होताच संपूर्ण गावात रॅलीने मार्गक्रमण पुर्ण करत बेलापूर सेवा संस्थेच्या प्रांगणात सर्वजण एकत्र आले. 

       दरम्यान १ ऑगस्टपासुन सुरू झालेल्या या शेतकरी युवक संवाद यात्रेच्या निमित्ताने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील  गावागावात जाऊन तेथील शेतकरी, युवक आणि जनतेसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणिस हेमंत ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जि.प. सदस्य बाबासाहेब दिघे, मार्केट कमिटीचे सभापती सुधीर नवले यांच्या उपस्थितीत सहाव्या दिवशी करण ससाणे आणि हेमंत ओगले यांनी सकाळच्या सत्रात श्रीरामपूर तालुक्यातील हरेगांव, उंदीरगांव, माळेवाडी तर दुपारच्या सत्रात वळदगांव, उंबरगांव आणि शेवटी बेलापूर येथील ग्रामस्थांसमवेत संवाद साधला. 

        आजपर्यंत अनेक गावातील घराघरात ही यात्रा पोहचली. शेतकऱ्यांच्या आणि युवकांच्या सन्मानासाठी शेतकरी युवक संवाद यात्रेनिमित्त आवाज तुमचा संपर्क आमचा हे ब्रिद वाक्य घेऊन, मतदारसंघातील अंतिम घटकापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी व त्यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी शेतकरी युवक संवाद यात्रा सुरू केलेली आहे.
जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी मोटारसायकल रॅली काढत भव्य स्वागत केल्याबद्दल उपस्थितांचे आभार मानत युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असून श्रीरामपूर तालुक्यात टॅलेंटची कमी नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहून श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस पक्षाचा तसेच स्व. जयंतराव ससाणे यांचा बालेकिल्ला असल्याची ओळख कायम ठेवा स्व. ससाणे यांचे बेलापूरकरांशी जवळचे नाते होते आता आपल्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटीचे सरचिटणिस हेमंत ओगले बेलापूर येथे झालेल्या सभेत मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, निष्क्रीय लोकप्रतीनिधी आल्याने गावांच्या समस्या सुटल्या नाहीत. श्रीरामपूर एमआयडीसीत निम्म्याहून अधिक कंपन्या बंद आहेत ज्या चालु आहेत त्यामध्ये परप्रांतीय तरुण काम करतात स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला पाहीजे ही आमची भुमिका आहे. तसेच इतर बंद कंपन्या चालु करण्यासाठी प्रयत्न करून रोजगाराची निर्मिती केली जाणार आहे. तसेच शेतीसाठी पुर्ण दाबाने वीज मिळत नाही. दिवसा आठ तास पुर्ण दाबाने वीज मिळायला हवी यासाठी प्रयत्न केले जाईल, शेतीमालाला भाव नाही, शेती निसर्गावर अवलंबून असून शेती निसर्गचक्रात सापडल्यास जोडधंदा असणाऱ्या दुधाच्या दराचा देखील प्रश्न आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे श्रीरामपूर जिल्हा झाला पाहीजे हे स्व. जयंतराव ससाणे यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करून याबाबत आवाज उठवला जाणार आहे.
       यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे आपल्या भाषणात म्हणाले की, स्व. जयंतराव ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच करण ससाणे यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद उंदीरगांव गट आणि दत्तनगर गटात मोठे विकासाचे काम झाले असून बांधकाम समिती सभापती असताना देखील विकासकामे केल्याचे सर्वश्रृत आहे. ससाणे कुटुंबियांनी नेहमीच विकासाला प्राधान्य दिलेले आहे. असेही यावेळी ते म्हणाले
मार्केट कमीटी सभापती सुधीर नवले म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आजपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचे काम होत आहे. शेतकऱ्यांसाठी नेहमीच सहकार्याची भूमिका असून हेमंत ओगले यांच्या रुपाने आपल्या आशिर्वादाची गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी शेतकरी युवक संवाद यात्रेतील  सभेत युवक, शेतकरी, आणि ससाणे समर्थकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

श्रीरामपूर जिल्हासाठी प्रयत्न करून स्व. ससाणेंचे स्वप्न पुर्ण करू.
स्व. जयंतराव ससाणे यांनी श्रीरामपूर जिल्हा व्हावा या दृष्टीने श्रीरामपूरात सर्व शासकीय कार्यालये आणली असुन त्यांचे जिल्ह्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असे करण ससाणे, हेमंत ओगले यांनी गावागावात जाऊन शेतकरी युवक संवाद यात्रेच्या निमित्ताने शेतकरी, युवक आणि ग्रामस्थांना आश्वासन दिले.

*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close