विश्वहिंदू परिषद - बजरंग दल यांनी घेतली दखल ; दिला आंदोलनाचा इशारा ...
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : शाळेतील विद्यार्थ्यांना 'कपाळावर गंध' लावण्यास बंदी केल्याबाबत आणि अशी कोणतीही बंदी करून नये यासाठी नगर शहरातील भिंगार उपनगरातील विश्वहिंदू परिषद - बजरंग दल यांनी रयत शिक्षण संस्थेचे अंबट हायस्कूल येथील मुख्याध्यापकांना निवेदन दिले .
सदर निवेदनात म्हटले आहे की , भारतात प्राचीन काळापासून हिंदू संस्कृतीमध्ये मंदिरात देवघरात दर्शन घेऊन देवा समोरील गंध आपल्या कपाळावर लावून दिवसाची सुरुवात करण्याची फार जुनी परंपरा आहे. तसेच या परंपरेचे चांगले परिणाम विज्ञानामुळे सिद्ध झाले आहे. कपाळावर गंध लावल्यामुळे एकाग्रता वाढते तसेच तेथे आज्ञाचक्र असल्यामुळे एक प्रकारे शरीर व मन नियंत्रित राहते.
हा देश हिंदूचा देश आहे . या देशात बहुसंख्य हिंदू राहतात . असे असताना आपण विद्यार्थ्यांना 'कपाळावर गंध' लावण्यास बंदी करुन येथील बहुसंख्य हिंदूच्या भावनांचा अनादर करत आहात.
मंदिरात / देवघरात दर्शन घेऊन देवा समोरील गंध आपल्या कपाळावर लावण्याचा विद्यार्थ्यांचा हक्क आहे त्यापासून आपण त्यांना वंचित ठेवू शकत नाहीत. यापुढे गंध लावण्यास विरोध करू नये व तसे आपण केल्यास शाळा व पदाधिकारी यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा बजरंग दलचे संयोजक श्री. सतिष (नाना) मोरे व सदस्य यांनी निवेदनाद्वारे दिला आहे .
यावेळी बजरंग दलाचे सदस्य बादल डोकडे , राहुल धोत्रे , सुनिल नवगिरे , अरुण ठाकुर , सुरज गाडेकर , सोनु तागडकर , लहु धोत्रे , दिपक धोत्रे आदि युवा सदस्य उपस्थित होते .