shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

कुठलेही वैधानिक पद जरी नसलं तरी दहा वर्षांमध्ये जनतेचे मात्र पद आपल्याकडे कायम होतं - हर्षवर्धन पाटील.

कुठलेही वैधानिक पद जरी नसलं तरी दहा वर्षांमध्ये जनतेचे मात्र पद आपल्याकडे कायम होतं - हर्षवर्धन पाटील.
इंदापूर (वकीलवस्ती): इंदापूर तालुका हा संस्कारमय तालुका असून महाराष्ट्रातला नावाजलेला तालुका होता. महाराष्ट्रात २८८ तालुके आहेत परंतु इंदापूर तालुक्याचे राजकीय वजन याचा आपण विचार केला पाहिजे. खरंतर निवडणुका येतील जातील. पण अभ्यास कोण करत. विषयाची आकलन कोणाला आहे. विषय समजतात कोणाला. काम करण्याची पद्धत कोणाची आहे. प्रशासनामध्ये वचक कोणाचा असतो, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. दहा वर्ष आपल्याकडे कुठलेही वैधानिक पद जरी नसलं तरी दहा वर्षांमध्ये जनतेचे मात्र पद आपल्याकडे कायम होतं. आपण जनतेच्या आशीर्वादावर आत्तापर्यंत मंत्री असो आमदार असो नसो या जनतेच्या पाठबळावर  या तालुक्याची सामाजिक, राजकीय, सार्वजनिक प्रश्न हे सोडवण्यामध्ये आपण कायम पुढाकार घेतला असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वकीलवस्ती येथे वकीलवस्ती ते भांडगाव रस्ता या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी(दि. २ ऑगस्ट) वकीलवस्ती ग्रामस्थांशी संवाद साधताना व्यक्त केले. 

यावेळी पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चा अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे, अशोक घोगरे, विलासराव वाघमोडे,उदयसिंह पाटील, सुरेश मेहर ,धनंजय कोरटकर ,सदानंद कोरडकर,  राजेंद्र कोरटकर, सचिन घोगरे, धनंजय पांढरे, बाबू दडस, माऊली घोगरे, शिवाजी कोरटकर, बाळासाहेब फरतडे, राजेंद्र भोळे, प्रकाश धुमाळ, विठ्ठल धुमाळ, शेखर घोगरे, ओमराव घोगरे, चंदू भोसले, विलास धुमाळ, रामभाऊ कोरडकर, बाळासाहेब पवार, विक्रम कोरटकर, ,रामदास चोरमले, आबा बागल, कॉन्ट्रॅक्टर दराडे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
चौकट: 
बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटामध्ये भोडणी ,वकीलवस्ती, बावडा, टणू येथील २५ कोटी पेक्षा जास्त रकमाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण संपन्न करत आहोत. रस्ते, सभामंडप इत्यादी कामासाठी बऱ्यापैकी निधी उपलब्ध करून दिला आहे.- 
भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे.


----------------------------
फोटो ओळ: वकीलवस्ती येथे रस्त्याच्या कामाचे शुभारंभ करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व इतर मान्यवर.
close