श्री पळसनाथ विद्यालयात अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी.
इंदापूर (पळसदेव):
श्री पळसनाथ विद्यालय पळसदेव या येथे (दि. १ ऑगस्ट) अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील शिपाई पदावरती कार्यरत असलेले जेष्ठ कर्मचारी संपत येडे यांची अध्यक्षस्थानी निवड करून त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक सर, पर्यवेक्षक संजय जाधव सर ,इरकल सर,कुंभार सर ,जाधव ए बी सर, बनकर सर, पवार सर, शेलार सर, यमपुरे सर,निंबाळकर सर, संदीप काळे सर, गीते सर, दशवंत सर, जाधव के. के सर, देशमुख सर, जगदाळे सर, खिलारे सर, लोणकर सर, क्षत्रिय सर, सय्यद सर, महिला अध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पवार सर यांनी केले तर आभार इरकल सर यांनी मांनले.