इंदापूर:
कुठलीही निवडणूक आली की बरीच लोक आणि काही यंत्रणा ही जाणीवपूर्वक मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. आज एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला जातो. वास्तविक पाहता आम्ही प्रामाणिकपणे एवढं सातत्याने आघाडीमध्ये असो की महायुतीमध्ये असो. मागचे आम्ही वीस वर्षे आघाडीमध्ये होतो. त्यावेळेस सुद्धा बरीच लोक आम्हाला टार्गेट करायचे आणि आत्ता आम्ही महायुतीमध्ये आहे तरीसुद्धा आत्ता काही लोकांचा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो. काही जरी झालं तरी हर्षवर्धन पाटील या राजकीय क्षितिजावर असता कामा नये अशा काही लोकांची व्हीव रचना सातत्याने होते. आणि ह्या भावना आमच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना आहे.
तो बोलून दाखवतोय. वास्तविक पाहता १९५२ सालापासून बघितलं तर या मतदारसंघांमध्ये आज पाच सहा पिढ्या झाले आम्ही सर्वजण सगळे कार्यकर्ते गुन्ह्या गोविंदाने एक कुटुंब म्हणून या तालुक्यात काम करत होतो. एक नाळ जोडल्या गेलेली आहे. ह्या सगळ्या सामान्य माणसाची जो काय विकासाची घोडदौड चालू झाली आणि इंदापूर तालुका महाराष्ट्र मध्ये एक नावा रूपाला आला. कर्तुत्वाच्या माध्यमातून हा तालुका पुढे निघाला. या तालुक्यातल्या सर्व जाती धर्मांना सगळ्यांना समाजाला आम्ही सातत्याने सर्वांबरोबर घेऊन जातो. कधीही आमच्याकडून चुकीचं वागवलं जात नाही. आम्ही अपशब्द वापरत नाही. दादागिरी करत नाही. गुंडगिरी करत नाही. कधी गैर मार्गाने कुठल्याही गोष्टी करत नाही .आम्ही एवढ्या मोठ्या सत्तेत असताना सुद्धा विरोधकांना त्रास दिला नाही. मग असं असताना सुद्धा निवडणूक आली की हर्षवर्धन पाटील टार्गेट करायचं हे जे काय षडयंत्र आहे. याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात एक तीव्र नाराजी आहे. असंतोष आहे. मला ही ते जाणवत आहे .
मतदार राजा ठरविल कोणाला कोणी टार्गेट करायचं आणि मला विश्वास आहे. इंदापूर तालुक्याचा सामान्य माणूस हा आर्थिक दृष्ट्या जरी गरीब असला तर तो स्वाभिमानी आहे. तो राजकीय, सामाजिक परिवर्तन बघणारा माणूस आहे. म्हणून लोक ठरवतील कोणाला टार्गेट करायचा आहे. आज तरी मात्र आम्हाला टार्गेट करण्याचं मोठं षडयंत्र चाललेलं आहे. तो आम्हाला जाणवतो आहे .वेगवेगळ्या माध्यमातून ती माहिती आमच्यापर्यंत येत आहे .मध्यंतरी आमच्यावरच बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता.
आम्हाला गावागावात फिरून देण्याची वक्तव्य झाली होती. आता कदाचित तसा प्रकारची परत यंत्रणा वेगवेगळ्या माध्यमातून आमच्या बाबतीत घडते की काय ?असा प्रश्न निर्माण होतो. त्या वेळेस पत्र दिलं होतं ,ट्विट केलं होतं. आम्हाला सुद्धा या राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना भीती वाटते अशी काय घटना घडते की काय आणि ती कदाचित पुन्हा आता टार्गेट केल्यामुळे काही घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भिगवन येथे जनतेशी सुसंवाद करण्यासाठी गेले असता तेथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्या व त्यांच्या कार्यकर्त्याबद्दल भावना व्यक्त केले.