शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
धार्मिक बातमी
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही. पी. एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धेसाठी इयत्ता पाचवी ते आठवी वर्गातील जवळपास
52 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या
विचारांमधून लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या बालपणीच्या कथा सांगितल्या त्याचबरोबर त्यांचे समाज हिताचे आणि देशाचे कार्यही त्यांनी आपल्या वक्तृत्वामधून उपस्थित त्यांना सांगितले. सहभागी विद्यार्थ्यांपैकी इयत्ता पाचवी गटामधून विराज गिड्डे
(प्रथम), भगवती साधवे (द्वितीय), इयत्ता सहावी गटामधून अनुजा ( वाघ (प्रथम), कासिम शेख (द्वितीय), इयत्ता सातवी गटामधून अदिती पोवार (प्रथम), दर्शना पालघर (द्वितीय), इयत्ता आठवी गटामधून दिव्या चव्हाण (प्रथम) तर सृष्टी पाळेकर (द्वितीय) क्रमांक पटकावले.
प्रशालेचे प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ यांनी भूषवले. कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे, सांस्कृतिक समिती प्रमुख श्री. धनंजय काळे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर आणि ज्येष्ठ शिक्षक श्री. अनिल खामकर उपस्थित होते.
स्पर्धेचे नियोजन सांस्कृतिक समिती प्रमुख श्री. धनंजय काळे आणि कलाशिक्षक श्री. योगेश कोठावदे यांनी तर स्पर्धेचे परीक्षण श्री. वैभव सूर्यवंशी यांनी केले.
स्पर्धेसाठी सहभागी विद्यार्थ्यांचे आणि प्रथम, द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे नियामक मंडळाचे अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजय भुरके नियामक मंडळ सदस्य तथा शाला समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. धनंजय काळे यांनी केले.