श्रीरामपूर / प्रतिनिधी:
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांमध्ये भारत सरकार निती आयोग व अटल इनोवेशन मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर अटल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केलेले होते. या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातील शाळा सहभागी होऊन नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करून विविध मॉडेल्स व त्यांची माहिती ही ऑनलाइन सादर केलेली होती.
या स्पर्धेमध्ये निवडल्या गेलेल्या प्रकल्पाची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली असून कु.तेजस्विनी शिंगारे व भक्ती शिवलकर या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ब्लाईंड स्पॉट इंडिकेटर या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. या प्रकल्पासाठी एन पावर व बेयर या कंपनीमार्फत श्री प्रशांत गायकवाड, प्रियंका रणनवरे व जय पवार तसेच विद्यालयातील पंकज देशमुख, आदिनाथ जोशी , शुभांगी गटने , सोनाली पुंड, वनिता जंगले, राणी शेटे, वृषाली कुलकर्णी, संगीता कुलकर्णी, रंजना बारहाते व पुंड अजय यांचे मार्गदर्शन लाभले होते.
हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष ॲड अनंत फडणीस, सहसचिव रणजीत श्रीगोड, अनिल देशपांडे, अशोक उपाध्ये, विद्यालयाच्या माध्यमिक विभागाचे चेअरमन दत्तात्रय साबळे, ज्युनिअर कॉलेजच्या चेअरमन डॉ.ज्योत्स्ना तांबे , मुख्याध्यापिका विद्या कुलकर्णी, उपमुख्याध्यापक किशोर खुरांगे, पर्यवेक्षक अनिता शिंदे यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
संकलन,समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - ९५६११७४१११